तरुण भारत

रत्नागिरी : कोरोनाबाधितांची संख्या तेराशे पार ; नवे ४७ रुग्ण तर एक मृत्यू

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात प्राप्त अहवालांमध्ये ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बाधितांनी तेराशेचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा 42 वा बळी आहे.

मंगळवारी १९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७६८ झाली आहे. डिस्चार्ज मिळालेल्या मध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय १, संगमेश्वर २, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली १५ आणि कामथे मधील एकाच समावेश आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय २१, कामथे-२४, कळबणी- १, ॲन्टीजेन चाचणीत एक जण बाधित आढळला आहे.

सायंकाळची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह १३०९
बरे झाले ७६८
उपचारात ४९९
मृत्यू ४२

Advertisements

Related Stories

अंघोळ करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Patil_p

ऑक्सिजन निर्मितीत सिंधुदुर्ग स्वयंपूर्ण

NIKHIL_N

गणरायाची आस स्वस्थ बसू देईना..!

NIKHIL_N

आयकर पात्र, सरकारी नोकरदारांना नोटिसा

NIKHIL_N

युवा शेतकऱयांवर ‘बाहुबली’ची क्रेझ

NIKHIL_N

एलईडी मासेमारी बंदीचा कायदा लवकरच

Patil_p
error: Content is protected !!