तरुण भारत

सोलापूर ग्रामीणमध्ये १४७ कोरोनाबाधितांची भर; एकूण संख्या २१४१ वर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी 147 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 83 पुरुष, 64 स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 2141 कोरोनाबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी मंगळवारी दिली.

आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर,  मंगळवेढा, बार्शी, सांगोला, माळशिरस, माढा तालुक्‍यातील आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1606 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1459 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 147 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 2141 रुग्णांपैकी 1324 पुरुष 817 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 619 जण बरे होऊन घरी गेली आहेत.


कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट 375
मंगळवेढा 53
बार्शी 514
माढा 83
माळशिरस 93
मोहोळ 157
उत्तर सोलापूर 171
करमाळा 26
सांगोला 18
पंढरपूर197
दक्षिण सोलापूर 454
एकूण 2141

होम क्वांरटाईन – 2711
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 16204
प्राप्त अहवाल- 16120
प्रलंबित अहवाल- 84
एकूण निगेटिव्ह – 13980

कोरोनाबाधितांची संख्या- 2141
रुग्णालयात दाखल – 1474
आतापर्यंत बरे – 619
मृत – 48

Advertisements

Related Stories

उद्गीर साहित्य संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे

Patil_p

कोरोना काळात शरिरसंपदेचे महत्व अधोरेखित : चंद्रकांत पाटील

Rohan_P

सोलापूर : भोसरे येथील ५ घरांवर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक जण जखमी

Abhijeet Shinde

कुर्डुवाडीत सहा रेल्वे सुरक्षा जवानांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून प्रतिदिन सहाशे दुचाकी सोडणार

Abhijeet Shinde

घटनापीठासाठी महाराष्ट्र सरकारचा पुन्हा अर्ज

Omkar B
error: Content is protected !!