तरुण भारत

दुसऱया दिवशी सेन्सेक्सची 511 अंकांची उसळी

वृत्तसंस्था /मुंबई :

चालू आठवडय़ातील सलग दुसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्स 511 अकांनी तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. कोविड19 वर लस शोधण्यासाठी जगभरातील विविध देश प्रयत्न करीत आहेत. यामध्ये आक्सफर्डची लसीला मोठे यश मिळत असल्याची निरीक्षण नोंदवण्यात आली आहेत. यामुळे लवकरच लस मिळयण्याच्या अपेक्षेने जागितक शेअर बाजारात तेजी राहिली. याचाच प्रभाव भारतीय बाजारावर राहिल्याचे सेन्सेक्समध्ये उत्साहाची नोंद झाली.

Advertisements

दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात जोरदार लिलाव झाल्याने देशातील बाजारा तेजीत राहिले आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स 511.34 अंकांनी वधारुन निर्देशांक 37,930.33 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 140.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,162.25 वर स्थिरावला आहे.

सेन्सेक्सच्या प्रमुख कंपन्यांमध्ये पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी नफ्यात राहिले असून सोबत मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, कोटक बँक, ऍक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तेजीत राहिलेत. मात्र अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेन्ट्स आणि सन फार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झालेत.

कोविड लसीची प्रतिक्षा

सध्या कोविडवर लस शोधण्याची जगात स्पर्धा मोठय़ा प्रमाणात सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लस विकसित करण्यात यश मिळत असून याबाबत एक पाऊल अव्वल होत ऑक्सफर्ड यशस्वी होत असून अन्य देशासह भारतही यासाठी प्रयत्न करीत आहे. यासह अन्य सकारात्मक घडामोडीचा परिणाम जगासोबत देशातील शेअर बाजाराला तेजी नोंदवण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related Stories

रियलमीचे वर्षा अखेरपर्यंत कर्मचारी संख्या वाढविण्याचे ध्येय

Patil_p

रिलायन्ससोबतचा एअरटेलचा करार पूर्ण

Patil_p

पेटीएमच्या प्रभावात बाजारात नुकसान सत्र

Amit Kulkarni

किया इंडियाच्या वाहन विक्रीत दमदार तेजी

Patil_p

‘यूटीआय फोकस्ड इक्विटी फंड’ सादर

Patil_p

जगातील सर्वात स्वस्त डाटा भारतामध्ये

Patil_p
error: Content is protected !!