तरुण भारत

विश्व सांघिक टेनिसमधून कॉलिन्सची हकालपट्टी

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क :

कोरोना संदर्भातील प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्याने अमेरिकन टेनिसपटू डॅनेली कॉलिन्सची विश्व सांघिक टेनिस स्पर्धेमधून हकालपट्टी केल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. वेस्ट व्हर्जीनिया येथील विश्व सांघिक टेनिस स्पर्धेवेळी कॉलिन्सने कोरोना संदर्भातील नियमाचे उल्लंघन केले होते.

Advertisements

वेस्ट व्हर्जीनिया येथे विश्व सांघिक टेनिसतर्फे तीन आठवडय़ांचा टेनिस हंगाम सुरू झाला होता. त्यावेळी उत्तर अमेरिकेतील काही मोजक्या शौकिनांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. कॉलिन्सने ग्रीनब्रियर रिसॉर्टमधून परवानगीशिवाय बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. या कारणास्तव कॉलिन्सची  विश्व़ सांघिक टेनिस उर्वरित भागासाठी हकालपट्टी केल्याचे कार्लोस सिल्वा यांनी सांगितले. 2019 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत कॉलिन्सने उपांत्य फेरी गाठली होती.

Related Stories

दीपक पुनियासह दोन मल्लांना कोरोनाची बाधा

Patil_p

आणखी एका विजयास मुंबई इंडियन्स सज्ज

Patil_p

कोरियन गोल्फ स्पर्धेत पार्क केयुंग विजेती

Patil_p

कर्णधार ब्रेथवेट शतकाच्या समीप, विंडीज 7 बाद 287

Patil_p

कर्नाटकाचा आंध्रप्रदेशवर 7 गडी राखून निर्विवाद विजय

Patil_p

थिएगो अलकांटरा लिव्हरपूलमध्ये दाखल

Patil_p
error: Content is protected !!