तरुण भारत

उद्योजक राजेंद्र कवडे यांचे निधन

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी उद्यमनगर येथील कवडे आयर्न वकर्स आणि कवडे इंजिनिअरिंग वर्कस्चे मालक उद्योजक राजेंद्र बळीराम कवडे (वय 59) यांचे निधन झाले. पार्किसन्सच्या आजाराने ग्रस्त असलेल्या कवडे यांच्यावर खासगी रूग्णालयात गेले आठवडा उपचार सुरू होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगे, बहीणी असा मोठा परिवार आहे. वडील बळीराम कवडे यांनी पुलीचे उत्पादन सुरू केले. आजही दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात कवडे वर्कस्ची पुली प्रसिद्ध आहे. वडिलांनी सुरू केलेला पुली निर्मितीचा उद्योग वाढविण्याचे काम राजेंद्र कवडे यांनी केली. उद्यमशील स्वाभावामुळे कवडे यांचा मोठा मित्र परिवार होता. अनेक नवोदितांना उद्योग, व्यवसायात उभे करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे मित्रपरिवार, नातेवाईकांना त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता आले नाही.

Advertisements

Related Stories

कोरोनाची धास्ती : अमरावती-अचलपूरमध्ये 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन

Rohan_P

नाशिक पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का?; फडणवीसांना आता पोलीस आयुक्तांकडून उत्तर

Abhijeet Shinde

जयश्री जाधव यांची बिनविरोध निवड, हीच खरी श्रद्धांजली

Sumit Tambekar

ईपीएसच्या पेन्शनवाढीचा लवकरच निर्णय घेणार : केंद्रीय कामगार मंत्री ना. भूपेंद्र यादव

Abhijeet Shinde

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशी आयोगाने ठोठावला २५ हजारांचा दंड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : टोपमधील त्या रुग्णाच्या पत्नी व मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!