तरुण भारत

कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

प्रतिनिधी / पणजी :

राज्यात कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. एका बाजूने कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे, तर दुसऱया बाजूने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारी एकाच दिवशी कोरोनामुळे तीन रुग्णांना मृत्यू आला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 26 एवढी झाली आहे.

Advertisements

मंगळवारी सकाळी दोन कोरोनाबाधित रुग्णांना मृत्यू आला होता. हे दोन्ही रुग्ण 65 वर्षांचे होते. एका रुग्णाला ईएसआय इस्पितळात मृत्यू आला, तर दुसऱया रुग्णाला गोमेकॉतून ईएसआय इस्पितळात नेताना मृत्यू आला, तर तिसऱया रुग्णाचा दुपारी मृत्यू झाला. सदरचा इसम खोर्ली म्हापसा येथील असून त्याला म्हापसा आझिलो इस्पितळात नेण्यात आले होते. त्याचा अगोदरच मृत्यू झाला होता. त्याचे वय 52 वर्षांचे होते. त्यांचा अहवाल नंतर कोरोना पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्यात कोरोनाची धास्ती वाढली आहे. याअगोदर एकाच दिवशी तीन कोरोनाबाधित रुग्णांना मृत्यू आला होता. मंगळवारी पुन्हा दुसऱयांदा एकाच दिवशी तीन रुग्ण दगावण्याची घटना घडली आहे. वयस्क व्यक्ती किंवा अन्य आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका आहे असे सांगण्यात येत होते, मात्र हल्ली कोरोनामुळे दगावलेले रुग्ण हे 29 वर्षांपासून 47 व त्यावरील वयोगटातील आहेत. तरुणांनाही मृत्यू येऊ लागल्याने लोकांमध्ये कोरोनाची दहशत वाढली आहे.

 फैलाव वाढतच आहे

आता सर्वच भागामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत चालला असून काल मंगळवारी नव्याने 174 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 1552 एवढा झाला आहे. काल एकूण 88 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

गोव्याच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत आहे. वास्को प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 356 वर गेला आहे. तर कुठ्ठाळीतील स्थिती गंभीर बनत असून कोरोनाबाधितांची संख्या 380 वर पोहचली आहे. रस्ता, रेल्वे व हवाई वाहतुकीद्वारे आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 140 झाली आहे. सांखळीतील रुग्णसंख्या प्रचंड गतीने वाढत असून आकडा 79 वर पोहचला आहे. पेडणेची रुग्णसंख्या 21 आहे. तर वाळपईची रुग्णसंख्या 7 व डिचोलीची रुग्णसंख्या 4 आहे. म्हापसा येथील रुग्णसंख्या 60 वर पोहचली आहे; पणजीची रुग्णसंख्या 24 झाली आहे.

बेतकी येथील रुग्णसंख्या 11, कांदोळीची रुग्णसंख्या 27, कासारवर्णे 18, कोलवाळ 34, खोर्ली 23 तर चिंबलची रुग्णसंख्या 79 वर पोहचली आहे. शिवोली 9 तर पर्वरीची रुग्णसंख्या 24 झाली आहे. कुडचडे 14 तर काणकोण 8 रुग्णांची नोंद झाली आहे. मडगावची कोरोना रुग्णसंख्या 55 झाली आहे. बाळ्ळी 8, कासावली 10, कुडतरी 18, लोटली 8, मडकई 7, केपे 13, शिग्नरोडा 9, धारबांदोडा 29, फोंडा 53 व नावेलीची कोरोना रुग्णसंख्या 20 एवढी झाली आहे. अजूनही 3810 चाचण्यांचे अहवाल अजून यायचे आहेत. स्थिती दिवसेंदिवस वाईट होत असल्याने लोकांमध्ये भीतीची छाया पसरली आहे.

Related Stories

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सुदेवा, इंडियन ऍरोजचे विजय

Amit Kulkarni

स्तनपान करणाऱयांना लसीकरणात प्राधान्य

Patil_p

पोळे येथून सुटलेली चोरटी दारू माजाळी चेकनाक्यावर पकडली

Amit Kulkarni

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे कार्यशाळा

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुनच शैक्षणिक धोरण आखावे

Omkar B

दुरुस्ती विधानसभेतच होणे आवश्यक

Omkar B
error: Content is protected !!