तरुण भारत

पोस्टल कॉलनी पाचगाव येथे आढळले तीन पॉझिटिव्ह रुग्ण

पाचगाव/प्रतिनिधी

पोस्टल कॉलनी पाचगाव येथे बुधवारी सकाळी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पोस्टल कॉलनी मधील एका कुटुंबांमधील पती-पत्नी आणि त्यांच्या चार वर्षे मुलगीचा बुधवारी सकाळी कोरोनापॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यामुळे पोस्टल कॉलनी परिसरात खळबळ उडाली आहे. या कुटुंबीयांचे वाघबीळ येथे हॉटेल आहे. या हॉटेलच्या व्यवसायानिमित्त ते वाघबीळ येथे जात असत. दोन दिवसापूर्वी या कुटुंबीयांचा कोरोना तपासणीसाठी स्वँब दिला होता. तो पॉझिटिव आला आहे.

पाचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच हा परिसर सील करण्यात आला आहे. कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पी. जे. चोपडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पाचगाव मध्ये आज अखेर एकूण सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

पुलवामा हल्ल्यातील ‘त्या’ वीर योद्ध्याची पत्नी सैन्यात दाखल

Abhijeet Shinde

आमदार गोपीचंद पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी हाकले औत

Abhijeet Shinde

पालिकेत विषय समितीच्या सभापती निवडी बिनविरोध

Patil_p

विटा बँकेची ३० लाखांची फसवणूक;आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Sumit Tambekar

कागल शहरात आठ पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!