तरुण भारत

आपला जीव, आपल्या हातात : मुख्यमंत्री येडियुरप्पा

बेंगळूर/प्रतिनिधी


राज्यात यापुढे लॉकडाउन होणार नाही, परंतु कोरोना विषाणूच्या साथीच्या तीव्रतेचा विचार केल्यास, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे मुखवटे घालावेत आणि सामाजिक अंतर राखावे. तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे आणि उपायांचे काटेकोरपणे पालन करावे, आपला जीव, आपल्या हातात असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशीसंवाद साधताना म्हंटले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आता आपला जीव वाचविण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रथमच सोशल मीडियाच्या माध्यमातून २३ मिनिटांचे भाषण केले. हे भाषण यूट्यूब आणि फेसबुकवर प्रसारित झाले आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी लॉकडाउनच्या विविध टप्प्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित होता परंतु अनलॉक झाल्यानंतर बेंगळूर शहरासह विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक जागरूक झाले पाहिजे. तसेच 55 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध आणि 10 वर्षाखालील मुलांनी घर सोडू नये. असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वैद्यकीय कर्मचारी, विविध विभागांचे प्रशासकीय कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी यांच्यासह विविध कोरोना वॉरियर्स गेले सहा महिने अथक परिश्रम घेत आहेत. परंतु या प्रयत्नांबरोबरच जनतेचे समर्थन अधिक महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील परिस्थितीत आपली छोटा निष्काळजीपणा खूपच महाग पडू शकतो , म्हणूनच आगामी काळात आपल्याला अधिक सावध व सतर्क राहावे लागेल. असे त्यांनी म्हंटले आहे.

Advertisements

Related Stories

ब्रिटनमधून आलेल्या त्या महिलेची तपासणी

Patil_p

महापालिका आयुक्तांनी घेतला पथदिपांचा आढावा

Patil_p

राज्य सरकारविरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱयांचे आंदोलन

Omkar B

आंतरराष्ट्रीय पॅराटेबलटेनिसपटूंची बेळगावला भेट

Patil_p

बेळगावात 72 पोलिसांना कोरोनाची लागण

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट आकारणार पार्किंग शुल्क

Patil_p
error: Content is protected !!