तरुण भारत

सांगली : बेडग येथे दीड कोटींचे गुटखा साहित्य जप्त

ऑनलाईन टीम / मिरज

तालुक्यातील बेडग येथे गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आलेली 16 चाकी ट्रक पोलीस उपअधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह पोलीस पथकाने पकडली. या ट्रकमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचे गुटखा साहित्य असल्याचे सांगण्यात आले. कर्नाटकातून हा माल आल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईमुळे मिरज ग्रामीण भागात गुटखा तस्करी जोमात सूरु असल्याचे स्पष्ट झाले.

बेडग येथे मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास मिरज-बेडग रस्त्यावर एक ट्रक कोट्यवधी रुपयांचे गुटखा साहित्य घेऊन येणार असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधीक्षक संदीपसिंग गिल यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने मिरज-बेडग रस्त्यावर सापळा रचला होतो. रात्री दीडच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना एक 16 चाकी ट्रक (आरजे-14-3898) हा मिरजेच्या दिशेने येत असल्याचे दिसले. त्यावेळी पोलिसांनी हा ट्रक पकडून तपासणी केली असता सुगंधी तंबाखू आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.

Related Stories

मणेराजूरीतील प्राचार्य चंद्रकांत पाटील यांची अचानक बदली, बेमुदत हायस्कूल व कॉलेज बंद

triratna

वड्डी येथील बेपत्ता तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह

triratna

पाच वर्षात 25 कोटींचा गहू, तांदूळ खराब

tarunbharat

सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२५ टक्के

triratna

खातेदारांना मोफत अपघात विमा संरक्षण

Patil_p

कोल्हापूर : सीपीआरच्या अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नियुक्ती

triratna
error: Content is protected !!