तरुण भारत

सोलापूर शहरात 64 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, चौघांचा मृत्यू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

सोलापूर शहरात आज, बुधवारी 64 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. बरे झाल्याने 51 जणांना घरी सोडण्यात आले, तर उपचारा दरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

आज, 1002 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 64 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 938 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 64 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 34 पुरुष तर 30 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4052 झाली आहे.


-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 21529

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4052

-प्राप्त तपासणी अहवाल : 21244

-प्रलंबित तपासणी अहवाल : 285

-निगेटिव्ह अहवाल : 17192

-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 333

-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1477

-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2242

Related Stories

सोलापूर : भाजपाच्या उपोषणाचे झाले क्षणिक आंदोलन

triratna

ज्येष्ठ नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

triratna

पीपीई किट उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर!

Omkar B

चांगली पिढी घडविणे हे देखील महत्वाचे करिअर : चारुदत्त आफळे

Rohan_P

तबलिगी जमात कार्यक्रमातील 960 परदेशी काळ्या यादीत

prashant_c

कोल्हापूर : शाहूवाडीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!