तरुण भारत

राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

बुधवारी 55 रुग्णांचा मृत्यू : 1780 जण संसर्गमुक्त : 4,764 नवे रुग्ण

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असतानाचा गुरुवारी पुन्हा रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. मागील 24 तासांत 4764 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात आढळून आलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे. सोमवारी 72, मंगळवारी 61 तर बुधवारी 55 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक असून बुधवारी 1780 जण बरे होऊन घरी परतले. तर मंगळवारी 1664 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यात आतापर्यंत 75833 बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 27,239 कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1519 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे उपचारातील रुग्णसंख्या 47,069 इतकी झाली आहे.

मागील 24 तासांत बेंगळूर शहर जिल्हय़ात 2050, उडुपीत 281, बेळगाव 219, गुलबर्गा 175, मंगळूर 162, धारवाड 158, म्हैसूर 145, बेंगळूर ग्रामीण 139, रायचूर 135, बळ्ळारी 134, चिक्कबळ्ळापूर 110, दावणगेरे 96, कोलार 88, चिक्कमंगळूर 82, बिदर 77, हासन 72, गदग 71, बागलकोट 70, कारवार 63, शिमोगा 59, विजापूर आणि तुमकूर जिल्हय़ात प्रत्येकी 52, हावेरी 50, रामनगर 45, यादगीर 43, चित्रदुर्ग 40, मंडय़ा 37, चामराजनगर 31, कोप्पळ 21 आणि उडुपी जिल्हय़ात 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

पंतप्रधान मोदी व नथुराम गोडसे यांची विचारधारा एकच : राहुल गांधी

prashant_c

जी-7 बैठकीला मोदींची अनुपस्थिती

Patil_p

हुतात्मा मेजर ढौंडियाल यांची पत्नी सैन्यात सामील

Patil_p

पुदुच्चेरीत राष्ट्रपती राजवटीला मान्यता

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 280 नवे कोरोना रुग्ण; 09 मृत्यू

Rohan_P

प्रणव मुखर्जींच्या पुत्राचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!