तरुण भारत

गोवा किंवा केरळमध्ये होणार आयएसएल

आय लीग स्पर्धा कोलकात्यात भरविण्याचा एआयएफएफचा निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

2020-21 मोसमातील इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा गोवा किंवा केरळमध्ये आणि आय लीग फुटबॉल स्पर्धा कोलकात्यात आयोजित केली जाणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. कोव्हिड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने मंगळवारी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सांगितले.

‘आयएसएलचे आयोजक एफएसडीएल केरळ व गोव्यातील पदाधिकाऱयांशी आयएसएल स्पर्धा एकाच राज्यात भरविण्याच्या शक्यतेबाबत चर्चा करीत आहेत,’ असे एआयएफएफने लीग समितीच्या बैठकीनंतर निवेदनाद्वारे सांगितले. एआयएफएफचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रता दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ‘आय लीग स्पर्धा कोलकात्यात आयोजित करण्याचा तात्पुरता निर्णय या समितीने घेतला आहे. यासाठी संबंधित राज्य संघटनेला राज्य सरकारकडून लिखित स्वरूपात मंजुरी घ्यावी लागणार आहे,’ असेही त्यात म्हटले आहे.

द्वितीय विभागीय लीग सप्टेंबरच्या तिसऱया आठवडय़ात सुरू करण्याचा समितीचा प्रस्ताव आहे. ट्रान्स्फरचा कालावधी 20 ऑक्टोबरला संपणार असल्याने त्याचा विचार करून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय 14 ऑगस्ट रोजी घेतला जाईल. याशिवाय प्रस्तावित फुटसाल लीग सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात घेण्याचे ठरले आहे. पण ती लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे. फुटसाल लीग पहिल्यांदाच होणार असून प्रेक्षकाशिवाय ती खेळविणे योग्य होणार नसल्याने ती लांबणीवर टाकण्याबाबत विचार होणार आहे.

Related Stories

यजमान ऑस्ट्रेलिया 282 धावांनी आघाडीवर

Patil_p

मलेशियन स्क्वॅश स्पर्धेत सौरभ घोसाळ विजेता

Patil_p

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून बेन्सिकची माघार

Patil_p

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : सेरेना, मरे, मुगुरुझाची विजयी सलामी

Patil_p

स्मृती मानधनाचे नाबाद अर्धशतक

Amit Kulkarni

आय लीग स्पर्धा सहा आठवडे स्थगित

Patil_p
error: Content is protected !!