तरुण भारत

दिल्लीत गेल्या 24 तासात 1227 नवे कोरोना रुग्ण; 29 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 1227 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 26 हजार 323 वर पोहचली आहे. यामधील 14 हजार 954 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisements

 
बुधवारी 1532 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  07 हजार 650 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3719 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 8 लाख 71 हजार 371 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5250 आरटीपीसीआर टेस्ट आणि 14,810 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर  दरम्यान, सध्या दिल्लीत 693 कॅन्टोन्मेंट झोन आहेत. 

Related Stories

TMC नेत्याला भाजपच्या गुंडांकडून मारहाण

datta jadhav

भारत-पाक शस्त्रसंधीचे पालन कसोशीने करणार

Amit Kulkarni

‘या’ राज्यात 4 महिन्यांनंतर आजपासून शाळा सुरू

Rohan_P

कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात न्यायमूर्ती मित्र म्हणून 3 ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती

datta jadhav

सर्वोच्च न्यायालयात 9 नवे न्यायाधीश नियुक्त

Amit Kulkarni

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ राज्य सरकारच्या नजरकैदेत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!