तरुण भारत

कोरोनाचा उद्रेक : देशात गेल्या 24 तासात 45,720 नवे रुग्ण; एकूण संख्या 12 लाख पार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

बुधवारी भारतात कोरोनाच्या रुग्ण वाढीने नवा उच्चांक गाठला आहे. देशात मागील 24 तासात 45 हजार 720 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,129 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 12 लाख 38 हजार 635 वर पोहचली असून, मृतांची संख्या 29 हजार 861 एवढी आहे.

 
सध्या देशात 4 लाख 26 हजार 167 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 82 हजार 606 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 
महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 37 हजार 607 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 1 लाख 86 हजार 492, दिल्ली 1 लाख 26 हजार 323, गुजरातमध्ये 51 हजार 399, मध्यप्रदेश 24 हजार 842, आंध्र प्रदेश 64 हजार 713, बिहार 30 हजार 369, राजस्थान 32 हजार 673, उत्तरप्रदेश 55 हजार 588 तर पश्चिम बंगालमध्ये 49 हजार 321कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

सीएएचा लाभ घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लिमांचे धर्मांतर!

Patil_p

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 30 लाखाचा टप्पा

datta jadhav

दिलासादायक : दिल्लीत एका दिवसात 2411 रुग्णांना डिस्चार्ज

pradnya p

चिंताजनक : पंजाबमधील कोरोना रुग्णांची संख्या 60 हजार पार

pradnya p

‘या’ बंदरामुळे मालवाहतुकीचा 20 टक्के खर्च कमी होणार

datta jadhav

‘या’ राज्यातील सरकारी नोकऱ्या आता केवळ स्थानिकांनाच

pradnya p
error: Content is protected !!