तरुण भारत

भेंडवडेत आणखी दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

वार्ताहर / खोची

भेंडवडे ता. हातकणंगले येथे आज गुरूवारी आणखी दोन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. गावात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चारवर गेली आहे. आणखी चार अहवाल तपासण्यासाठी दिले आहेत. आज कोल्हापूर येथे अँडमिट पेशंटचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच या पेशंटच्या संपर्कातील आणखी एका महिलेचा अहवाल राञी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोल्हापूर येथील डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बाधित परिसर बंदिस्त केला असून औषध फवारणी केली आहे. गावामध्ये नागरिकांना बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गाव शंभर टक्के लॉकडाऊन झाले आहे. तपासणीसाठी दिलेल्या चार अहवालांकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. हे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आणखी काही जणांचे स्वॅब तपासावे लागणार आहेत.

Related Stories

कोल्हापूर : गोकुळ ठरावधारकाचा कोरोनाने बळी

Abhijeet Shinde

राशिवडे येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

Abhijeet Shinde

अंबाबाई मंदिर ३० एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद

Abhijeet Shinde

वड्डी गावच्या 15 एकर शेतात शिरले ड्रेनेजचे पाणी

Abhijeet Shinde

रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आणखी नव्या 8 रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

नियम धाब्यावर बसवणार्‍या हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!