तरुण भारत

चंदगड तालुक्यात कोरोनाचे नवे तीन रूग्ण

प्रतिनिधी /चंदगड :

चंदगड तालुक्यात गुरूवारी बुजवडे, हलकर्णी आणि ढेकोळीवाडी येथे एक-एक रूग्ण आढळला असून तालुक्याची रूग्णसंख्या 324 झाली आहे. दरम्यान तांबुळवाडी येथे एका संशयिताचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात तो कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नव्हता, त्याचा स्वॅबही घेतलेला नव्हता, असा खुलासा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी केला आहे.

Advertisements

चंदगड तालुक्यात सध्या 170 ऍक्टीव्ह रूग्ण असून त्यापैकी 160 रूग्ण चंदगड येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 10 रूग्ण कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये ऍडमिट आहेत. अजूनही 25 स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह रूग्णापैकी 82 रूग्ण दौलतचे कामगार असून त्यांच्या जवळच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविणे आवश्यक असताना त्यांचे कुटुंबिय सहकार्य करत नसल्याचेही डॉ. आर. के. खोत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तांबुळवाडी येथे रूग्णसंख्या 63 असून त्यापैकी 9 जण बरे झाले आहेत. तर 54 रूग्ण उपचार घेत अहेत. दरम्यान तांबुळवाडीच्या एका व्यक्तीचा गुरूवारी मृत्यू झाला. तो चंदगडच्या कोविड केअरमध्ये स्वॅब देण्यासाठी आला होता. तथापि त्यांच्याकडे कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने त्या रूग्णास गडहिंग्लजला पुढील उपचारासाठी पाठवत असताना त्यांचे वाटतेच निधन झाले. स्वॅब घेतलेला नसल्यामुळे कोरोनाने त्या रूग्णाचा मृत्यू झाला, असे म्हणता येत नाही, पण तो कोरोना संशयित रूग्ण होता, असे म्हणता येईल, असा खुलासा डॉ. आर. के. खोत यांनी केला आहे.

Related Stories

कणबर्गीतील रस्त्यासाठी शेतकरी संघटनेकडून पाठपुरावा

Amit Kulkarni

फुल विक्रीमध्ये लाखेंची उलाढाल

Amit Kulkarni

खानापूर म. ए. समितीकडून शिवपुतळा विटंबनेचा निषेध

Amit Kulkarni

यल्लम्मा डोंगरावर चार लाखाहून अधिक भाविक

Patil_p

ज्येष्ठ क्रिकेटपटु बाबू खानापूरकर यांचे दुःखद निधन

Rohan_P

मच्छे औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni
error: Content is protected !!