तरुण भारत

येळ्ळूरमधील एकाला कोरोनाची लागण

प्रतिनिधी /बेळगाव :

कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येळ्ळूरमध्ये कोरोनाबाधितचा दुसरा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी एका महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर ती महिला कोरोनामुक्त झाली. त्यामुळे गावातील भीती दूर झाली होती. मात्र, आता पुन्हा आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आता जनतेने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisements

कोरोनाबाबत ग्राम पंचायतीने जनजागृती करूनही अनेक जण दुर्लक्ष करत आहेत. मास्क न वापरता फिरणे, सुरक्षित अंतराचा अभाव, सॅनिटायझरचा वापर न करणे अशा घटना निदर्शनास येत आहेत. तेव्हा प्रत्येकाने आता तरी काळजी घ्यावी, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

येळ्ळूरमधील एका महिलेला लागण झाल्यानंतर संपूर्ण गाव सीलबंद करण्यात आले होते. आता कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या घरापासून 50 मीटरचे अंतर सीलबंद करण्यात येणार आहे. मात्र, सर्वांनीच अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. मला काही होणार नाही, अशा भ्रमात कोणीही राहू नये. हा आजार संसर्गजन्य आहे. तेव्हा काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.

 विनाकारण बाहेर फिरणे, एकत्रित घोळका करून थांबणे, काही जणांनी सूचना केली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे, त्याला काय समजते असे टोमणे मारून नियमांचे उल्लंघन करणे हे कोठे तरी थांबले पाहिजे. अन्यथा, याचा फटका सर्वांनाच बसण्याची शक्मयता नाकारता येत नाही.

गुरुवारी संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्या गल्लीमध्ये जाऊन बांबूच्या साहाय्याने गल्ली सीलडाऊन करण्यात आली. मात्र त्यानंतर अधिकाऱयांच्या सूचनेनुसार बांबू काढण्यात आले. त्यामुळे अहवाल निगेटिव्ह आला म्हणून संभ्रमावस्था निर्माण झाली. तेक्हा प्रत्येकाने अशा अफवा न पसरविता काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

Related Stories

जिल्हय़ात पुन्हा कोरोनाचे 13 पॉझिटिव्ह

Patil_p

गोहत्या बंदी विधेयक संमत झाल्याने कारवार जिल्हय़ात आनंदोत्सव

Patil_p

पिरनवाडीत वाहनधारकांची कसून चौकशी

Amit Kulkarni

जिल्हय़ातील साडेचार लाख जणांचा अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni

मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी घेतली बेळगाव विमानतळाची दखल

Patil_p

मनपात आठ कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती

Amit Kulkarni
error: Content is protected !!