तरुण भारत

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच

प्रतिनिधी /पणजी :

गुरुवारी 174 नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून 114 जण बरे झाल्याने घरी परतले आहेत. सध्या 1666 रुग्ण असून 36 जणांना संशयित म्हणून गोमेकॉत आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 4350 कोरोनाबाधित मिळाले असून त्यातील 2655 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने आतापर्यंत 29 बळी घेतले आहेत.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार 68 विदेशी तर 26 देशी प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 52 प्रवाशांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून विविध रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मिळून एकूण 209 जणांना क्वारंटाईन केले आहे. 3012 जणांचे नमुने काल कोरोनासाठी घेण्यात आले त्यातील 2402 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात 174 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. उर्वरित नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

विविध आरोग्य केंद्रात नोंदणी झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. सांखळी-91, पेडणे-26, म्हापसा-63, पणजी-35, कांदोळी-21, कासारवर्णे-18, कोलवाळ-43, खोर्ली-25, चिंबल-87, शिवोली-13, पर्वरी-22, कुडचडे-13, मडगाव-72, वास्को-373, कुठ्ठाळी-400, कुडतरी-19, लोटली-24, केपे-11, धारबांदोडा-49, नावेली-18, विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 132 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

गोव्यात अनेक भागात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असून त्यांची संख्या प्रतिदिन 100 ते 150 च्या वर जात आहे. मागील काही दिवसात तर 200 च्या जवळपास कोरोनाबाधित प्रति दिन सापडले आहेत. त्याच्या तुलनेत बरे होणाऱयांची संख्या मात्र कमी आहे. कोरोनाच्या या वाढत्या संकटामुळे पुन्हा एकदा मोठय़ा कालावधीचे लॉकडाऊन करावे, अशी मागणी जोर धरीत असून तीन दिवशीय लॉकडाऊनमधून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे समोर आले आहे.

Related Stories

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना पितृशोक

tarunbharat

शाळा 15 ऑक्टोबरनंतर सुरू करण्याच्या हालचाली

Patil_p

आता गुरांची संपूर्ण माहितीचे डिजिटायझेशन होणार

Patil_p

पणजी मार्केट अजूनही कोरोनाच्या भीतीत

Omkar B

सभापती राजेश पाटणेकर यां?ना गोमेकॉतून डिस्चार्ज

Patil_p

जागतिक योगदिनी ऑनलाईन ‘योग’ जुळून आला..

Omkar B
error: Content is protected !!