तरुण भारत

सांगली : मणेराजूरीत चोरट्यांचा धुमाकूळ

मणेराजूरी / प्रतिनिधी

मणेराजूरीत गेल्या चार दिवसात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. लॉक डाऊनमध्ये चोऱ्यांच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . गुरुवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान सांगली रोडवरील राहुल पवार यांच्या घरात चोरी करून चोरट्याने सोने -चांदीसह सुमारे पन्नास हजारांचा ऐवज लंपास केला तर दुसरीकडे हरिजन वस्तीत एकाच्या घराची कौले काढून चोरीचा प्रयत्न केला. तर तिसऱ्या घटनेत गावानजीक हणमंत जमदाडे यांच्या गोठयातील शेळी व बोकड ( सुमारे पंचवीस हजार रूपये ) लंपास केले तर गणेश तोडकर यांच्या दुकानचे शटर उचकटली आहे. तर या अगोदर खंडू पवार यांची स्प्लेंडर मोटारसायकल , गव्हाण रोडवरील ट्रॅकरची चाके असा चोरट्यांनी डल्ला मारला आहे . या सर्व घटनांचा तासगाव पोलीसांनी पंचनामा केला आहे. चोरटयांना तातडीने जेरबंद करावेे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisements

Related Stories

सोलापूर शहरात २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

वाढीव हद्दीला वाली कोण ?

Patil_p

सरनाईकांच्या पत्रातील ‘हा’ मुद्दा महत्त्वाचा : संजय राऊत

Abhijeet Shinde

कोल्हापूर विभागात सातारा दुसऱया स्थानी

Patil_p

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी २० ऑगस्टला

Abhijeet Shinde

सोमवारपासून 3 हजार शाळा सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!