तरुण भारत

हातकणंगले येथे जुगार अड्ड्यावर छापा


रेल्वे खात्यात नोकरी करीत असलेल्या दोघासह सात जणाना अटक, पाच मोबाईल संचसह व रोख रकमेसह १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

कोल्हापूर / प्रतिनिधी

Advertisements

हातकणंगले गावातील दत्त मेडिकल नजीक सुरु असलेल्या तीनपानी  जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या सात जणांना रंगेहाथ पकडून अटक केली. यामध्ये दोघेजण रेल्वे खात्यात नोकरी करीत आहेत. ही कारवाई हातकणंगले पोलिसांनी केली.

अटक केलेल्यांच्यामध्ये सचिन प्रकाश मोरे, महेश अशोक पांडव , संदीप प्रकाश मोरे, निहाल औरंगजेब मुजावर, भाऊसो आण्णासो कदम, नागेश दुर्गाप्पा हंचनाळ आणि हारूण सिकंदर मुजावर (रा. सर्व हातकणंगले ) या सात जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच मोबाईल संच व रोख रकमेसह 13100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रशिक्षणार्थी उपाधिक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पाटील, अतुल निकम व सुहास गायकवाड यांनी केली आहे.

Related Stories

सातारा, सोलापूर, नांदेड, कोल्हापूरची आगेकूच

Patil_p

तीन दिवसात 4204 जणांची कोरोनावर मात

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 14 कोरोना रूग्ण

Abhijeet Shinde

लॉकडाऊनसंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार – मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : यड्राव येथे चारचाकीच्या धडकेत​ एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!