तरुण भारत

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार; महिला अटकेत

ऑनलाईन टीम / मुंबई : 

कोरोनावर प्रभावी ठरलेल्या ॲक्टेमरा टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला औषध व अन्न प्रशासनाच्या कारवाईनंतर पोलिसांनी अटक केली. 

Advertisements

निता पंजवाणी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. अन्न प्रशासन विभागाच्या निशिगंधा पाष्टे यांच्या तक्रारीवरून पंजवाणी यांच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प नं-3 मनीषनगर परिसरात ही महिला राहते. ही महिला कोरोनावरील ॲक्टेमरा टोसिलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची माहिती औषध व अन्न प्रशासन विभागाच्या निशिगंधा पाष्टे यांना मिळाली. त्यानुसार पंजवाणी यांच्या घरावर गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास औषध व अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी सिप्ला कंपनीचे 40,545 रुपये किंमतीचे ॲक्टेमरा टोसिलीझुमॅब हे इंजेक्शन 60 हजार रुपयांना विकताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत उल्हासनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Related Stories

८४ टक्के शालेय शिक्षकांनी घेतला लसीचा एक डोस: शिक्षण विभाग

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोना बाधित

Abhijeet Shinde

श्रीलंका दौर्‍यासाठी इम्रान खान करणार भारतीय हवाई क्षेत्राचा वापर

datta jadhav

न्यायपालिकेत महिलांची हिस्सेदारी वाढविण्यात यावी

Patil_p

वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलरचा निधी

prashant_c

कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ‘टाटा ग्रुप’ कडून फाईव्ह स्टार ट्रीटमेंट!

prashant_c
error: Content is protected !!