तरुण भारत

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्याने अरेरावी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना सुनावले

प्रतिनिधी / सातारा

सातारा येथील टोल नाक्यावर दिव्यांग वाहनास टोल फ्री सेवा दिली जाते. मात्र, आनेवाडी टोल नाक्यावर झकपक ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्याची गाडी अडवली. त्या पदाधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांची आईबहीण काढत कायदा काय आहे. दाखवून दिले.अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने कर्मचाऱ्यांनी माफी मागितली अन तोडगा मिटला.

सातारा जिल्ह्यातले टोल नाके सतत गाजत असतात.लॉकडाऊनमुळे टोल नाक्यावर घडणाऱ्या घटना कमी झाल्या आहेत. याच कालावधीत आनेवाडी टोल नाक्यावर सूट घातलेले बॉडीगार्ड आणि ड्रेसमधल्या युवतींची नेमणूक केली असली तरी वादविवाद सूरुच आहेत. गुरुवारी दुपारी सातारा येथून पुण्याच्या दिशेला राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती भाग्यश्री काळभोर या आपल्या चार चाकीतून निघाल्या होत्या.

दिव्यांग चार चाकीला टोल नाका फ्री आहे. तरीही नव्याने नियुक्ती केलेल्या त्या कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यातच कामगार युवतीने त्यांच्या अपंगत्वावर टिप्पणी केली. त्यावरून काळभोर या संतप्त झाल्या. त्यांनी आपली गाडी लेनमध्ये ठेवून त्या कर्मचाऱ्यांची चांगली आई बहीण काढली. तासभर सुरू असलेला प्रकार अखेर महामार्ग पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर त्या कर्मचाऱ्यांनी माफी मागताच राष्ट्रीय अपंग महासंघाच्या त्या पदाधिकारी निघून गेल्या.

Related Stories

येत्या सोमवार पासून होणारा शिरोळ चा उरूस साजरा न करण्याचा एकमुखी निर्णय

triratna

गणेश मंडळाकडून मूर्तीचे बुकिंगच नाही

Patil_p

सातारा : तंटा मुक्तीने 80 वर्षाच्या वृध्दाचे समाधान

triratna

मुंबईतील ‘या’ 29 खाजगी रुग्णालयातही लसीकरण

Rohan_P

नाना पटोले यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा स्वबळाचा नारा

triratna

शियेत आणखी एक पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!