तरुण भारत

मशिदीत रूपांतरानंतर तुर्कीच्या हागिया सोफियात आज प्रथमच नमाज पठण

ऑनलाईन टीम / इस्तांबुल : 

तुर्कीच्या जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर झाल्यानंतर आज प्रथमच तिथे नमाज पठण केले जाणार आहे.

Advertisements

ख्रिश्चिन बायझंटाईन साम्राज्यात हागिया सोफियाची निर्मिती झाली. 1453 साली ऑटोमनांच्या काँस्ट्यनटीनोपलच्या विजयानंतर या संग्रहालयाचे रुपांतर मशिदमध्ये करण्यात आले होते. मात्र, त्याला आतापर्यंत संग्रहालयाचाच दर्जा देण्यात आला. मागील पंधरा दिवसांपूर्वीच तुर्कीच्या न्यायालयाने या संग्रहालयाचा संग्रहालय म्हणून असलेला दर्जा रद्द केला. त्यामुळे या संग्रहालयाचा मशिदीत रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप इरदोगोन यांनी हे संग्रहालय मुस्लिमांसाठी खुले केले आहे. 

आज या मशिदीत पहिल्यांदाच नमाज पठण होणार असून, त्याला तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैय्यप आर्दोआन उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

Related Stories

दफनभूमीत भाडेतत्वावर मिळतेय जागा

Patil_p

मॉडर्ना : सायबर हल्ला

Patil_p

गोवा शिवसेनेकडून नऊ उमेदवारांची घोषणा

Sumit Tambekar

गृहमंत्र्यांकडून मुंबई पोलिसांना सुरक्षा कवच 

prashant_c

…काय अंगार-भंगार काय घोषणा लावलीय?, तुमच्यावर हेच संस्कार आहेत का ? : पंकजा मुंडे

Rohan_P

चीनच्या सदोष कोरोना टेस्ट किटमुळे स्वीडन अडचणीत

datta jadhav
error: Content is protected !!