तरुण भारत

शिराळा येथे नागपंचमी उत्सवात इतरांना प्रवेश नाही

वार्ताहर / शिराळा

शिराळा येथे नागपंचमी उत्सवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरात फक्त पारंपरिक पद्धतीने पुजन व मानाच्या पालखीचे आगमन होईल. परंतु मंदिरात इतर कोणालाही प्रवेश अथवा दर्शनाला तसेच पालखी दर्शनासाठी नागरिकांना परवानगी नाही असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पारंपरिक विधी करताना शहरात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना मंदिरात प्रवेश नाही. अंबामाता मंदिरामध्ये सकाळी पुजारी यांचेकडून विधीवत पुजा होईल. तसेच दुपारी ठरल्यामार्गाने महाजन कुटुंबातील परवानगी दिलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत मानाच्या पालखीचे आगमन होईल. मात्र पालखीच्या दर्शनाला इतर कोणालाही परवानगी नाही. शहरात कडेकोट बंदोबस्त राहणार आहे असे तहसिलदार गणेश शिंदे यांनी सांगितले.

नगराध्यक्षा अर्चना शेटे म्हणाल्या, शहरातील नागरिकांकडून योग्य सहकार्य होत आहे. प्रशासनाला सहकार्य करत समन्वयातून यावेळची नागपंचमी शांततेत साजरी होईल. जिल्हाधिकारी, तहसिलदारांकडून आलेल्या सूचना शहरातील नागरिक पाळतील. आम्ही ही स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेऊन सहकार्य करू.

शहरातील लोकांचा प्रशासनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपंचमी आणि लॉकडाऊनमुळे शहरात मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला आहे. १ पोलिस उपअधीक्षक, ७ पोलिस अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड, १ नियंत्रण पथक, १ दक्षता पथक, तसेच वन विभागाचे १६४ कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष किर्तिकुमार पाटील, बांधकाम सभापती सुनिता निकम, प्रतिभा पवार, नगरसेवक बंडा डांगे, संजय हिरवडेकर, वैभव गायकवाड, विजय दळवी, विश्वप्रतापसिंह नाईक, सुनंदा सोनटक्के, केदार नलवडे, नेहा सुर्यवंशी, सीमा कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष हिरुगडे, संभाजी गायकवाड, प्रमोद पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

आपत्तीग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे

Patil_p

कोल्हापूर : दाऊद इब्राहिम सोलापूरे यांचे निधन

Abhijeet Shinde

जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरूच

Patil_p

सांगली : आमदार अनिल बाबर यांनी घेतली कोरोना लस

Abhijeet Shinde

साताऱ्यात 13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

पालघरमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!