तरुण भारत

82 टक्के कर्मचारी कार्यालयात जाण्यास उत्सुक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे जगासोबत देशातील विविध कंपन्यांनी आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कर्मचाऱयांना घरातून काम करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. परंतु मागील 4 महिन्यांपासून हा कालावधी वाढत गेला असून अजूनही काही काळ कोविडचा प्रभाव राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. परंतु यामध्येच जवळपास 82 टक्के कर्मचारी कार्यालयात जाण्यास उत्सुक असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

Advertisements

गेल्या एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून आयटीसह विविध क्षेत्रातील कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा दिली. आपल्या नेहमीच्या असणाऱया सवयींना मोठय़ा प्रमाणात आम्ही मनातून कायम मिस करत असल्याच्या प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहेत. घरातून काम करण्याची सोय  कोरोनाची परिस्थिती पाहता योग्य असली तरी दुसऱया बाजूला कर्मचाऱयांच्या भेटीगाठी, एकत्र बसून विचारमिनिमय व अन्य सवयींची आठवण येत असल्याच्या प्रतिक्रीया रियल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएलला दिल्या असल्याचे समजते.

सदर सर्वेक्षणामध्ये आशिया प्रशांत विभागातील पाच देशातील जवळपास 1,500 कर्मचाऱयांचा समावेश केला होता. एकूण निरीक्षणातून 61 टक्के कर्मचारी हे आपल्या कार्यालयास मिस करीत आहेत. भारतामध्ये हाच आकडा 81 टक्क्मयांवर असल्याची माहिती आहे.

Related Stories

बाजारावर आता ओमिक्रोनचे सावट

Patil_p

बायोकॉनचा नफा घटला

Patil_p

‘आयपीओ’ पाठोपाठ ‘लॉक इन’ नियमात बदलाचे संकेत

Amit Kulkarni

एस्कॉर्टस्चा इंडसइंड बँकेसोबत करार

Patil_p

पेटीएमची पोस्टपेड मिनी योजना लाँच

Amit Kulkarni

ऑक्टोबरमध्ये वाहन कंपन्याची कामगिरी तेजीत

Omkar B
error: Content is protected !!