तरुण भारत

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोरोनाचे दोन बळी

इस्लामपूर/प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील रोझावाडीचे ५१ वर्षीय माजी उपसरपंच आणि काळमवाडी येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मोठी धास्ती वाढली आहे.
इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरातील एक जण पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी विवाह सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सांगली येथील ३५ ते ४० जण आले होते. तसेच काही स्थानिक लोक ही होते. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. काळमवाडी येथील मुंबईहून आलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीला मिरज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच रोझावाडी गावचे माजी उपसरपंच यांचा ही गुरुवारी रात्री मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्यांचा शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यापूर्वी शिगाव येथील भाजी विक्रेती महिला, कामेरी येथील पोलीस यांचा मृत्यू झाला होता. तर फाळकेवाडी येथील एकाचा बळी गेला आहे. शुक्रवारी दोन बळी गेल्याने तालुक्यातील मृतांची संख्या ५ झाली असून त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.प्रशासणाकडून आरोग्यबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन

Abhijeet Shinde

मिरज येथे अँटीजन चाचणीस नकार देणाऱ्या तरुणास चोप

Abhijeet Shinde

म्हैसाळमध्ये हवेत गोळीबार

Abhijeet Shinde

कोयना पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू

Patil_p

महाराष्ट्रातील हॉटेल, मॉल आता रात्री 10 वाजपेर्यंत; ठाकरे सरकारचा निर्णय

Rohan_P

रिक्षा चालकास लुटणारा जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!