तरुण भारत

माढा तालुक्यात दोन कोरोनाबाधितांची भर; बाधितांचा आकडा शंभरीपार

कुर्डुवाडी : प्रतिनिधी

माढा तालुक्यात परिस्थिती वरचेवर बिकट होत चालली आहे. शुक्रवारी आणखी २ रुग्ण कोरोनाबाधित झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

माढा तालुक्यात शुक्रवारी ३७ अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये ३५ जण निगेटिव्ह आले असून रिधोरे येथील एक महिला व इर्ले (बार्शी) येथून आलेली एक महिला पाॅझिटीव्ह असल्याचे आढळले . तसेच शुक्रवारी तालुक्यातील एकूण ५७ जणांचा आज थ्रोट स्वॅब घेण्यात आला आहे.

आजपर्यंत ४४५ जणांचा अँटेजेन टेस्ट घेण्यात आली त्यामध्ये ३१ जण पाॅझिटीव्ह आले.तर आजपर्यंत थ्रोट स्वॅब एकूण ३२७ घेण्यात आले त्यामध्ये ७१ जण पाॅझिटीव्ह आले. यानुसार माढा तालुक्यात आजवर १०२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Advertisements

Related Stories

जिल्हय़ात कडक लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

Patil_p

वृक्षारोपणसाठी मुळपीठ डोंगरावर 100 खड्डे तयार!

Patil_p

आमदार पी. एन. पाटलांसह तिघांवर जाचहाटाचा गुन्हा

Patil_p

‘सोमय्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, दगडफेकीच्या आरोपावर भावना गवळींची प्रतिक्रिया

Abhijeet Shinde

नागदेववाडीतील राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी करा, अन्यथा आमरण उपोषण करणार

Abhijeet Shinde

अनुदान द्या अन्यथा तीव्र आंदोलन…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!