तरुण भारत

कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशीही पाच हजाराहून अधिक नवीन रुग्ण

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये कोरोनाचे दररोज नवनवे नवे विक्रमनोंदविले जात आहेत. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना वाढ कायम राहिली. शुक्रवारी राज्यात गेल्या चोवीस तासात ५००७ नवीन रुग्णांची भर पडली. त्याच वेळी, बेंगळूरमध्ये कोरोनाचे २२६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी राज्यात कोरोना-संक्रमित ११० रूग्णांचा मृत्यू झाला, त्यापैकी ५० बेंगळूरमध्ये मरण पावलेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण ५२७९१ पर्यंत वाढले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील २,०३७ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर बेंगळूरमध्ये ७४६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

Related Stories

घरपट्टी वाढ रद्दसाठी पुन्हा घेणार जिल्हाधिकाऱयांची भेट

Patil_p

तिसरे रेल्वेगेट येथे वाहनांच्या रांगा

Omkar B

तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱयांकडे अद्याप दुर्लक्ष

Patil_p

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च

Patil_p

पावसाळय़ापूर्वी नैऋत्य रेल्वेकडून घाटातील रेल्वेमार्गाची दुरूस्ती

Patil_p

धामणे येथे बसवाण्णा मंदिरात चोरी

Patil_p
error: Content is protected !!