तरुण भारत

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात दोघे पॉझिटिव्ह तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रतिनिधी / गगनबावडा

मांडुकली (ता.गगनबावडा) येथील मयत व्यक्ती व त्याचा भाऊ अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मयत व्यक्तीवर गुरूवारी अत्यंसंस्कार केलेनंतर शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मांडूकलीसह तालुक्याची चिंता वाढली आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी व नंतर घरी संपर्कात आलेल्या ४९ लोकांना गगनबावडा येथे क्वॉरंटाईन केले आहे. तालुक्यात यापूर्वीचे सातजण कोरोना बाधित आढळले होते . या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात पुन्हा शिरकाव झाला आहे. आजअखेर तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मांडुकली येथील ६८ वर्षीय व्यक्ती बायपासच्या ऑपरेशनसाठी कोल्हापूरातील शास्त्रीनगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत होती. परंतु याठिकाणी एक व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन रूग्णाला घरी आणत असताना दुर्दैवाने बायपास झालेल्या व्यक्तीचा मृत्यु झाला. दवाखान्यातील एक रूग्ण कोरोनाबाधीत असल्याने दवाखान्यातील इतरांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये मांडूकली येथील मयत व्यक्ती आणि दवाखान्यात त्यांच्या सेवेसाठी असणारा त्यांचा भाऊ अशा दोघांचा रिपोर्ट शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आला. गुरूवारी या मयत व्यक्तीवर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंत्यसंस्कारानंतर शुक्रवारी रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मयत व्यक्तीच्या भावाला शुक्रवारी रात्री उशीरा गगनबावडा येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Advertisements

Related Stories

अखेर मिरजकरांना मिळाले शुद्ध पाणी

triratna

दिलासादायक! नागपूरमध्ये दिवसभरात 7,266 जणांना डिस्चार्ज

pradnya p

पुरातत्वच्या कचाट्यात आता पंचगंगेचा घाट

triratna

बँक मॅनेंजरला महामार्गावर लुटले

Patil_p

कोवाडच्या अभय पतसंस्थेतील 20 लाखांच्या चोरीचा छडा

Shankar_P

”ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

triratna
error: Content is protected !!