तरुण भारत

कोल्हापूर : वाकरेतील एकाच कुटुंबातील 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

घरातील सर्व १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
सर्वजण संस्थात्मक अलगीकरणात
महानगरपालिकेने केले अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / वाकरे

Advertisements

वाकरे (ता. करवीर) येथील शाहूनगर परिसरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनावर उपचार सुरू असताना सीपीआर रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सदरची मृत व्यक्ती एमआयडीसी शिरोली येथील एका खासगी आस्थापनात सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करीत होती. गेल्या आठवड्यात ताप आणि कणकण जाणवू लागल्याने त्यांनी स्थानिक औषध दुकानातून औषधे घेतली. मात्र, त्यांचा ताप कमी येत नसल्याने सोमवार दि. २० रोजी त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा ताप कमी येत नसल्याने मंगळवारी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी देण्यात आला. बुधवार दि. २२ रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत ते मुलांसोबत बोलत होते. मात्र, मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, आरोग्य विभागाने त्यांच्या घरातील पत्नी, तीन मुले, तीन सुना, आणि तीन नातवंडे याचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. गुरुवारी तीन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर शुक्रवारी सात व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या कुटुंबातील दहा व्यक्तींना कोल्हापुरातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. घरातील सर्वच व्यक्ती अलगीकरणामध्ये असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने त्यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने परिसर सील करण्यात आला असून औषध फवारणी करण्यात आली आहे. सरपंच वसंत तोडकर यांनी गावकऱ्यांनी स्वयंशिस्त पाळून लॉकडाऊन करावा असे आवाहन केले आहे.

दुर्दैवी बापावर अशी वेळ
मृत व्यक्तीला तीन मुले असून सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोल्हापूरात संस्थात्मक अलगीकरनामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दुर्देवी बापावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये अशी भावना व्यक्त होत आहे.

अवघ्या आठवड्यात होत्याचे नव्हते
मृत व्यक्तीस गेल्या सोमवारी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. जाताना धडधाकट असणाऱ्या या व्यक्तीचा सातव्या दिवशी मृत्यू झाल्याने या कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एका मुलाचे लग्न झाले आहे.

Related Stories

कोल्हापूर : कागल तालुक्यात कोरोनाचे नवे ४२ रुग्ण

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील निर्बंध उठविण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले …

Rohan_P

कोल्हापूर : सर्पदंश झालेल्या बालकाचा उपचारा अभावी मृत्यु

Abhijeet Shinde

जिह्यातील रूग्णसंख्येचा आकडा अडीचशे पार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पंचगंगा नदी पात्रास अडथळा ठरणाऱ्या पुलांच्या भरावाबाबत लवकरच निर्णय – पालकमंत्री

Abhijeet Shinde

पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 84 ऐवजी 112 दिवसापर्यंत…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!