तरुण भारत

आजरा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय

प्रतिनिधी / कोल्हापूर

गवसे येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. आज शनिवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला.

Advertisements

३१ मार्च २०२० अखेर या कारखान्याकडील बँकेची थकबाकी १०४ कोटी रुपये होती. या थकबाकीच्या वसुलीसाठी बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट-२००२ नुसार हा कारखाना ताब्यात घेतला. त्यानंतर बँकेने बँकेसह, शेतकरी, कामगार, शासकीय देणी व इतर सर्व अशी २०७ कोटी रुपयांची देणी निश्चित केली. ही सर्व देणी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व चार्टर्ड अकाउंटंटकडून प्रमाणित झालेली आहेत. ही देणी भागविण्यासाठी कमीत कमी वर्ष चालविण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स या तत्त्वावर देण्याचा ठराव झाला. याबाबत बँकेच्या वतीने लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.

Related Stories

वाढीचा रतीब बंद होईना, मृत्यूदरही घटेना

Patil_p

आयसोलेशन चौक ते आर के नगर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणासाठी जागेची आखणी

Abhijeet Shinde

किणी टोल नाक्यावरील तपासणी बंद – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,361 नवीन कोरोनाग्रस्त; 190 मृत्यू

Rohan_P

शेतकरी आंदोलनावरून RSS ने भाजपला फटकारले

Abhijeet Shinde

बालिंगे पूलानजिक ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्रॉली उलटली

Sumit Tambekar
error: Content is protected !!