तरुण भारत

केरी सातेरी केळबाई आजोबा देवस्थान.

वाळपई प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील केरी श्री सातेरी केळबाई आजोबा देवस्थानाच्या गावकर समाजाला देवस्थानाची देवस्की देण्यासाठी आज आयोजित करण्यात

Advertisements

आलेल्या बैठकीत गावकर समाज गैरहजर राहिल्यामुळे आजची बैठक होऊ शकली नाही .  मात्र देवस्थानच्या प्रशासक तथा सत्तरी तालुक्मयाच्या संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर या बैठकीसाठी नियोजित वेळेत हजर झाल्या होत्या. मात्र गावकर समाज गैरहजर राहिल्यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यांनी वाट पाहिली व नंतर यासंदर्भात सर्वाधिकार देवस्थान समितीच्या कार्यकारी समितीला देण्यात आलेले आहेत.

 दरम्यान आजची बैठक रद्द करावी अशा प्रकारचे निवेदन गावकर समाजाने शुक्रवारी संध्याकाळी संयुक्त मामलेदाराना निवेदन सादर करण्यात आले होती अशी माहिती  उपलब्ध झाली आहे.

यासंदर्भात माहिती अशी की केरी सत्तरी येथील श्री सातेरी केळबाई आजोबा देवस्थानची देवस्की गावकर समाजाला देण्याच्या दृष्टीकोनातून आजची बैठक प्रशासक संजीवनी सातार्डेकर यांनी सकाळी दहा वाजता बोलावले होती. एरवी ही बैठक शुक्रवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रशासन संजीवनी सातार्डेकर यांना खाजगी कारणास्तव या बैठकीला हजर राहणे शक्मय न झाल्यामुळे ही बैठक शनिवारी निश्चित करण्यात आली होती. या संदर्भाची माहिती  या समाजाला देण्यात आली होती. मात्र आज पारंपारिक नागपंचमीचा उत्सव असल्यामुळे या दिवशी देवस्थान प्रांगणात उपस्थित राहणे शक्मय होणार नाही.  या उत्सवा दिनी देवस्थानाच्या  इतिहासात आतापर्यंत कोणत्या प्रकारचे धार्मिक कार्य न झाल्याचे कारण पुढे करून गावकर समाजाने ही बैठक रद्द करावी अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन शुक्रवारी मामलेदार कार्यालयात सादर करण्यात आले होते. दरम्यान ठरल्याप्रमाणे आज सकाळी प्रशासक संजीवनी सातार्डेकर या गावकर समाजाला देवस्की देण्याच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देवस्थान मंदिरात हजर झाल्या होत्या. मात्र गावकर समाजाची मंडळी सदर ठिकाणी न आल्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांनी वाट पाहून शेवटी देवस्की गावकर समाजाला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सर्वाधिकार देवस्थानच्या समितीला देण्यात आलेले आहेत .यामुळे गावकर समाजाला देवस्की देण्याची प्रक्रिया समिती पूर्ण करणार असून त्यासंदर्भात बैठक आयोजित करून याबाबत निश्चित प्रमाण तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते.

 या देवस्थानाची देवस्की यावरून गावस व गावकर यांच्या दरम्यान निर्माण झालेला वाद त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजाला आळीपाळीने देवस्की देण्याची परंपरा रूढ झालेली आहे. सध्या देवस्की करण्याचा मान गावस समाजाकडे असून तो गुढीपाडव्याच्या दिवशी गावकर समाजाकडे येण्याची गरज होती. मात्र काही कारणास्तव ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.आषाढी एकादशी दिवशी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकले नाही. पुन्हा एकदा शुक्रवारी ही बैठक बोलविण्यात आली होती. मात्र प्रशासक संजीवनी  सातार्डेकर या बैठकीत उपस्थित राहून न शकल्यामुळे ही बैठक आज शनिवारी 25 जुलै रोजी नागपंचमीच्या सणादिवशी निश्चित करण्यात आली होती.

Related Stories

होंडा येथील जुगारी अड्डय़ावर धाड

Omkar B

बेतोडा येथे वीज खांबामुळे वाहतुकीला धोका

Omkar B

काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांची पर्तगाळ मठाला भेट

Amit Kulkarni

गोवा हे देशातील संसाधन कार्यक्षमता धोरण असलेले प्रथम राज्य

tarunbharat

ओशेलात मृतावस्थेत सापडलेल्या रशियन महिलेचा खून

Patil_p

मगोच्या कार्यपद्धतीमुळेच बहुसंख्य नगरसेवकांचा पाठिंबा

Patil_p
error: Content is protected !!