तरुण भारत

कोरोनाचा कहर : सहाजणांचा मृत्यू

प्रतिनिधी/ मडगाव, पणजी

कोरोनाने गोव्यात हाहाकार माजविला आहे. मृत्यू येण्याचे सत्र कायम असून काल शनिवारी मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये आणखीन सहाजणांचा मृत्यू झाला. एका 14 वर्षीय मुलीचा गोमेकॉत मृत्यू झाला. त्यामुळे गोव्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 35 वर पोचली आहे. मडगावात एका भिकाऱयाला कोविडमुळे मृत्यू आला होता तसेच शुक्रवारी गोमेकॉत एका महिलेचा बळी गेला होता. त्या दोघांची सरकारतर्फे जारी करण्यात येणाऱया अधिकृत माहिती पत्रकात नेंदणी झालेली नाही.

Advertisements

  चोडण येथील 80 वर्षीय महिला तर सांखळी 85 वर्षीय पुरूष, वास्को 65 वर्षीय महिला तसेच रात्री 7.30 जुवारीनगर-वास्को येथील एका 53 वर्षीय रुग्णाचा बळी गेला. त्यानंतर तासाभरात 8.40 वा. न्यू वाडöवास्को येथील एका 54 वर्षीय व्यक्तीचा बळी गेला. खारीवाडा-वास्को येथील एका 14 वर्षीय मुलीचा गोमेकॉत बळी गेला. या मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला चिखली येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने गोमेकॉत पाठविण्यात आले होते. गोमेकॉत तिला विलगीकरण वार्डात दाखल करण्यात आले असता तिचा बळी गेला.

चोडण येथील महिलेला 22 जुलै रोजी गोमेकॉतून मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिग्नचा पहाटे 3.15 वाजता बळी गेला. वास्को येथील 65 वषीय महिलेचा 11 जुलै रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आला होते. शनिवारी सकाळी 9.30 वा. कोविड हॉस्पिटलात बळी गेला. विर्डी-साखळी येथील 85 वर्षे व्यक्ती मूळची विर्डी-साखळी येथील, परंतु मुंबईत स्थायिक झालेली. यंदा शिमगोत्सवाच्यावेळी पुन्हा गावी आली होती.

दगावणाऱयांना जुने आजार

लॉकडाऊनमुळे या व्यक्तीला पुन्हा मुंबईत जाणे शक्य झाले नाही. ती विर्डी-साखळी येथेच अडकून पडली होती. तिला कोरोनाची बाधा झाल्याने मडगावच्या कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी या व्यक्तीचा बळी गेला. कोविड हॉस्पिटलात बळी गेलेल्यांना पूर्वी विविध आजार होते, अशी माहिती कोविड हॉस्पिटलाच्या सूत्रांनी दिली.

खारीवाडा-वास्को येथील 14 वर्षीय मुलीचा बळी हा कोरोनाचा गोव्यातील सर्वात तरुण व्यक्तीचा बळी ठरला. सध्या वास्कोत कोरोनामुळे बळी जाण्याचे सत्र कायम असल्याने, येथील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झालेली आहे. 14 वर्षीय मुलीची प्रकृती खालावल्याने तिला गोमेकॉत नेण्यात आले. मात्र, तिला विलगीकरण वार्डात ठेवण्यात आले व तिची स्वॅब चाचणी घेण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली. यापूर्वी ही वास्कोतील एका तरूणाचा बळी गेला होता.

मुरगाव तालुका हादरला

दरम्यान, कोरोनाचा जबरदस्त आघात झालाय तो मुरगाव तालुक्यावर. काल शनिवारी तर एकाच दिवशी चौघांचे बळी गेले आहेत. तीन मडगावच्या कोविड हॉस्पिटलात तर एक गोमेकॉत. सध्या मुरगाव तालुका पूर्णत: हादरला आहे.

दरम्यान, कुंकळळी औद्योगिक वसाहतीत एका कामगाराला मृत्यू आल्याची चर्चा होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नाही. ही व्यक्ती बिगर गोमंतकीय असावी, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात होती.

अतिदक्षता विभागात तीन रुग्ण

कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात तीन रुग्ण उपचार घेत असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. काल कोविड हॉस्पिटलात 20 रुग्ण नव्याने दाखल झाले होते. त्यातील बरेचजण हे वयस्क आहेत. काल दिवसभरात कोविड हॉस्पिटलमधून 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मडगाव शहरात आतापर्यंत दोन भिकाऱयांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यातील एकाचीच सरकारच्या अधिकृत माहिती पत्रकात नोंदणी झालेली आहे. तर दुसऱयाची अद्याप नोंदणी झालेली नाही. शुक्रवारी गोमेकॉत वाडे-वास्को येथील एका वृद्ध महिलेचा बळी गेला होता. तिचीही सरकारच्या अधिकृत माहिती पत्रकात नोंद झालेली नाही. हे दोन बळी कोरोनामुळेच झालेले आहेत. जर ते अधिकृत माहिती पत्रकात नोंद झाले तर गोव्यातील बळीची एकूण संख्या 37 वर पोचते.

 प्रतिक्षेतील अहवालांची संख्या 6860

शनिवारी राज्यात 146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, मात्र दुसऱया बाजूने पेंडिंग असलेल्या अहवालांची संख्या प्रचंड वाढली आहे. 6860 चाचण्यांचे अहवाल अजून यायचे आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पेंडिंग राहण्यामागे नेमके कोणते कारण असावे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या राज्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह सक्रिय रुग्णांची संख्या 1606 एवढी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 182 एवढी आहे.

सांखळीतील रुग्णसंख्या 73 एवढी झाली आहे. पेडणे 7 तर वाळपईची रुग्णसंख्या 8 आहे. डिचोलीची रुग्णसंख्या 3 एवढी आहे. वास्कोची रुग्णसंख्या 360 झाली आहे. तर कुठ्ठाळीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा संख्येने चारशेचा आकडा पार केला आहे. तिथे एकूण 414 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. म्हापसा येथील रुग्णसंख्या 44 आहे, तर पणजीची रुग्णसंख्या 48 झाली आहे. चिंबलची रुग्णसंख्या 61 एवढी आहे. खोर्ली 17, कोलवाळ 47, कासारवर्णे 18, कांदोळी 23, बेतकी 7 व होळदोणा येथील रुग्णसंख्या 4 एवढी आहे. शिवोलीची रुग्णसंख्या 13 तर पर्वरीची रुग्णसंख्या 27 व मयेची 2 एवढी आहे. कुडचडे 15 तर काणकोणची रुग्णसंख्या 6 आहे.

मडगावची रुग्णसंख्या 95 एवढी आहे. बाळ्ळी येथील रुग्णसंख्या 15, कासावलीची 8 व चिंचणीची रुग्णसंख्या 2 एवढी आहे. कुडतरीची रुग्णसंख्या 13 तर लोटलीची 26 एवढी आहे. मडकईची 8 तर केपेची रुग्णसंख्या 8 एवढी आहे. सांगे 4, शिरोडा 5 तर फोंडय़ाची रुग्णसंख्या 42 आणि नावेलीची रुग्णसंख्या 29 वर पोहोचली आहे.

अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने गोंधळ

चाचणी केलेल्या अनेक रुग्णांचे अहवाल येण्यास बराच उशीर लागत आहे. 6860 एवढे अहवाल पेंडिंग आहेत. चाचणी केलेल्या व्यक्तीचा अहवाल येण्यास बराच उशिर लागतो. तोपर्यंत चाचणी केलेली व्यक्ती सर्वत्र मोकाट फिरते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. आरोग्य खात्यातील बोजा वाढत चालला आहे. दरदिवशी अहवाल पेंडिंग राहत आहेत. अहवाल पेंडिंग राहण्यामागे कारण काय, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. या 6860 पेंडिंग अहवालामागे किती अहवाल पॉझिटिव्ह असतील हेही सांगता येत नाही.

Related Stories

राज्यात आपचे नेते एलवीस गोम्स यांनी केजरीवालच्या नावे राजकारण करू नये-

Patil_p

पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे

Amit Kulkarni

मोरजी येथे 6 लाखांचा अमलीपदार्थ जप्त

Omkar B

हणजूण येथे रेव्ह पार्टीवर सीआयडीचा छापा

Patil_p

तब्बल 20 वर्षांनी वेरे गटारांची दुरुस्ती

Patil_p

वृक्षतोड, जंगल जाळपोळीमुळे डोंगराना भूस्खलनाचा धोका

Amit Kulkarni
error: Content is protected !!