तरुण भारत

जिल्हय़ात शनिवारी रुग्णसंख्या चार शतकाचा आकडा पार

411 अहवाल पॉझिटिव्ह तर कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू, अथणी तालुक्मयात रुग्णसंख्या वाढती

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी चार शतकाचा आकडा पार केला. गेल्या 24 तासांमध्ये 411 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोरोनामुळे 8 जण दगावले आहेत. अथणी तालुक्मयात 170 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण बाधितांच्या आकडय़ाने 2 हजाराचा टप्पा पार केला आहे.

जिल्हय़ातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भीतीदायक चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अथणी तालुक्मयात रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. शनिवारी अथणी तालुक्मयातील 170 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या तालुक्मयातील कोरोनाबाधितांची संख्या 550 वर पोहोचली आहे.

शहर, तालुक्मयातील 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

बेळगाव शहर व तालुक्मयातील 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील 56 व ग्रामीण भागातील 21 जणांचा समावेश आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये रुग्णसंख्या वाढतीच आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. ही संख्या वाढती आहे.

शनिवारी गांधीनगर, भाग्यनगर, शहापूर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, वडगाव, आझादनगर, शाहूनगर, अशोकनगर, खासबाग, रामतीर्थनगर, खंजर गल्ली, हनुमाननगर, जक्कीनहोंडा, पिरनवाडी व खडेबाजार परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी सकाळपर्यंत बाधितांचा आकडा 320 इतका होता. सायंकाळपर्यंत हा आकडा 411 हून अधिक झाला.

बाधितांवर कुठे उपचार करायचे?

वाढत्या रुग्ण संख्येमुळे बाधितांवर कुठे उपचार करायचे? असा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला आहे. बैलहोंगल, कटकोळ येथे पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. पोलीस दलाबरोबरच बेळगाव, बैलहोंगल येथे अबकारी विभागातील अधिकारी व कर्मचारी, रामदुर्ग व रायबाग तालुक्मयातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्हय़ात शनिवारी अथणी तालुक्मयात 170, बेळगाव तालुक्मयात 77, बैलहोंगल तालुक्मयात 26, चिकोडी तालुक्मयात 25, हुक्केरी तालुक्मयात 22 रुग्ण आढळून आले आहेत. खानापूर तालुक्यात 11, रामदुर्ग तालुक्मयात 6, गोकाक तालुक्मयात 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अथणी, कागवाड तालुक्मयातील वाढती रुग्ण संख्या चिंता वाढविणारी आहे. या दोन्ही तालुक्मयांना मिळून अथणी येथे एकच तालुका इस्पितळ आहे. त्यामुळे बाधितांवर कोठे उपचार करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कापड व्यापाऱयाला कोरोनाची बाधा

खडेबाजार येथील एका कापड व्यापाऱयाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने खडेबाजारमधील काही भाग सीलडाऊन केला आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे सहाजिकच प्रतिबंधक क्षेत्रांची संख्याही वाढत चालली आहे. वेळीच दक्षता घेतली नाही तर कोरोनाचा फैलाव आणखी वाढण्याची भीती आहे.

डीएचओ, टीएचओ ऑफीसमध्येही रुग्ण

कोरोना महामारी थोपविण्यासाठी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सेवा बजावत असलेल्या आरोग्य विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालय व तालुका आरोग्याधिकारी कार्यालयात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही कार्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून आरोग्य विभागाने मोठी खबरदारी बाळगली आहे. दरम्यान कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया बिम्समधील आणखी काही कर्मचाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काही खासगी इस्पितळातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारच्या अहवालात याचा उल्लेख आहे.

ईएसआयचे चार दवाखाने बंद

ईएसआय दवाखान्यात काम करणाऱया काही कर्मचाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पिरनवाडी, भाग्यनगर, चन्नम्मा सर्कल व शहापूर येथील चार दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या हिंडाल्को येथील दवाखाना सुरू आहे. अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तेथील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयही कोरोनाच्या धास्तीखाली वावरत आहेत.

सांबरा एटीएसमध्ये आणखी 16 जणांना बाधा

सांबरा येथील एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरमध्ये आणखी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याआधीही एटीएसमधील काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एटीएस परिसरातही व्यापक खबरदारी घेण्यात येत आहेत.

मृतांचा आकडाही वाढताच…

कोरोनाबाधित व संशयितांच्या मृतांचा आकडाही वाढतच आहे. गेल्या 24 तासांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आठहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने शनिवारी रात्री जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात हा आकडा 8 हून अधिक असल्याची माहिती मिळाली आहे. बेळगाव शहर व तालुक्मयातील 3, चिकोडी, हुक्केरी, गोकाक तालुक्मयातील प्रत्येकी 1, व अथणी तालुक्मयातील दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव शहर व उपनगरांमधील दोघा जणांचा यामध्ये समावेश आहे. दोघेही वडगाव परिसरातील आहेत तर तालुक्मयातील तिसरा बळी बडाल अंकलगी येथील झाला आहे. संकेश्वर येथील एका 65 वषीय वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी त्याचा मृत्यू झाला आहे.

रविवारीही मोठा आकडा बाहेर पडणार?

रविवारीही कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्मयता आहे. कारण जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 3 हजार 23 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल यायचे आहेत. तर 7 हजार 474 जण 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांच्या आकडय़ाने शनिवारी 2 हजारचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 40 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 500 च्या घरात पोहोचली आहे. सिव्हिल हॉस्पिटलसह जिल्हय़ातील वेगवेगळय़ा इस्पितळात व कोविड केअर सेंटरमध्ये 1500 हून अधिक जणांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार रविवारी कोरोनाबाधितांची संख्या पाच शतक पार करण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.

लॉकडाऊनचा चौथा रविवार

कोरोना महामारी थोपविण्यासाठी दर रविवारी लॉकडाऊन करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. या महिन्यात आतापर्यंत तीन रविवार कडक लॉकडाऊन पाळण्यात आले आहेत. 26 जुलैचा दिवस लॉकडाऊनचा चौथा रविवार असून शनिवारी रात्रीपासूनच पोलीस यंत्रणा यासाठी कामाला लागली आहे. गेले तिन्ही रविवारी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. शनिवारी कोरोनाबाधितांच्या संख्येने 400 चा आकडा पार केल्यामुळे चौथ्या रविवारीही आणखी कडक लॉकडाऊन होणार आहे. यापूर्वी शनिवारी रात्री 8 पासून सोमवारी पहाटे 5 पर्यंत सर्व व्यवहार बंद करण्यात येत होते. आता राज्य सरकारने रात्री 9 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा दिली असली तरी शनिवारी त्याआधीच सर्व व्यवहार बंद झाले होते. तर ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे करुन वाहतूक अडविण्यात आली होती. 32 तासांचा हा लॉकडाऊन असणार आहे.

Related Stories

स्मार्ट नकोत स्वच्छ बसथांबे हवेत

Patil_p

शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’ आणखी 11 रुग्णांची भर

Patil_p

तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक प्रगतीप्रथावर

Patil_p

आशा मनोहर यांचे निधन

Rohan_P

आरपीडी बीबीएमध्ये स्वागत-परिचय समारंभ

Amit Kulkarni

पाणीपट्टी न भरल्यास नळ जोडणी बंद करण्याचा इशारा

Patil_p
error: Content is protected !!