तरुण भारत

कारोनाच्या धास्तीत नागपंचमी साजरी

प्रतिनिधी/ बेळगाव

झाडांना गं बांधियले मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले….

Advertisements

श्रावण आला, पंचमी आली पण यंदा कोरोनामुळे असे मुलींच्या झोपाळय़ाचे दृष्य पहायलाच मिळाले नाही. पंचमी म्हणजे झोपाळे, हातभर बांगडय़ा भरून घेणे, तळहातावर मेहंदी रेखणे आणि फराळाची ताटे परस्परांना पोहोचवत त्याचा आस्वाद घेणे, यंदा अशा कोणत्याही धामधुमीशिवाय पंचमी साजरी झाली.

भारतीय सांस्कृतीमधील बहुसंख्य सण हे स्त्राr केंद्रित आहेत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबांचा पसारा लक्षात घेता नवविवाहितांना व महिलांना वेळ मिळणे कठीण. यासाठीच कदाचित पंचमी, मंगळागौर या सणांची आखणी केली गेली असावी. शिवाय एकूण भारतीय मानसिकता मातीला महत्त्व देणारी आहे. सर्प हा शेतकऱयाचा मित्र मानला जातो आणि मानवी समूहाला जे जे उपकारक, पोषक त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली प्रथा आहे.

याच हेतूने बेंदूर साजरा होतो. तेंव्हा बैलांची पूजा केली जाते व गाय तर सदैव पूजनीयच आहे. सापाबद्दल लोकांची भीती कमी क्हावी, जागरुकता निर्माण व्हावी आणि त्याचे महत्त्वही कळावे, या हेतूने पंचमीचा सण साजरा होतो. शेतीची कामे संपल्याने महिलांनाही थोडासा निवांतपणा मिळतो. याच निमित्ताने माहेरी जावून कोडकौतुक करून घेता येते म्हणून महिलावर्ग पंचमीची आवर्जून वाट पाहतो.

माहेरी गेल्यानंतर हमखास बांगडय़ा भरून घ्यायच्या. मेहंदी काढायची आणि झोपाळय़ावर झुलायचे. मात्र सिमेंटच्या जंगलामध्ये अलीकडे हे चित्र विरळ झाले असले तरी जेथे गर्द झाडी आहे तेथे आणि ग्रामीण भागात आजही हौशी मुली झोपाळे बांधून झोके घेतात. यंदा मात्र हे चित्र फारच विरळ झाले.

शहरात आणि ग्रामीण भागातही पंचमी साधेपणाने झाली. सण, उत्सवाची परंपरा अखंड रहावी, या हेतूने महिलांनी नागांच्या मूर्तींची पूजा केली. त्याला पातोळय़ा, आळू भाजी, हरभऱयाची उसळ असा नैवेद्य दाखविला. काही समाजामध्ये नाग, चंद यांना भाऊ मानण्याची प्रथा आहे. त्यामुळे चतुर्थीदिवशी उपवास केलेल्या महिलांनी पंचमीला उपवास सोडला.

सण साजरा पण उत्साह उणावला

पंचमी साजरी झाली. पण दरवषीचा उत्साह आणि लगबग काहीशी थंडावलेलीच दिसली. आता बाजारपेठेत कोरोना आल्याने बाजारात जाण्यासाठी नागरिकांना भीती वाटू लागली आहे. बांगडय़ा भरण्याचे निमित्त होऊन संसर्ग झाला तर या भीतीने महिलांनी कासाराकडे जाऊन बांगडय़ा भरून घेणेही टाळले. मेहंदी आणतानासुद्धा हाच विचार केला गेला. त्यामुळे एकूणच सण साजरा झाला पण उत्साह उणावला.

सायंकाळपर्यंत मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

शहर आणि परिसरात असणाऱया नागमंदिरांमध्ये तसेच कपिलेश्वर मंदिरात असणाऱया नागप्रतिमांची महिलांनी विधिवत पूजा केली. या प्रतिमांना दूध अर्पण करून नैवेद्य दाखविण्यात आला. सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन मंदिर समितीने सातत्याने केले. सायंकाळपर्यंत या मंदिरात भाविकांची प्रामुख्याने महिलांची गर्दी होती.

Related Stories

रोज किमान 200 लस उपलब्ध करा

Omkar B

सामान्य कंत्राटदारांसाठी लहान पॅकेजची कामे उपलब्ध करा

Patil_p

शिवसेना नेत्यांवर बेळगावात एफआयआर

Patil_p

तोतया पोलिसासह पाच जणांना अटक

tarunbharat

क्रॉसकंट्री स्पर्धेत प्रमोद, लक्ष्मण, साईश्री, संदीप, रंजिता, सुरेश देवरमनी विजेते

Amit Kulkarni

शेतकऱयांना माती परीक्षण कार्डचे वितरण

Omkar B
error: Content is protected !!