तरुण भारत

सातारा : जिल्हात रुग्णसंख्या तीन हजारावर

प्रतिनिधी / सातारा

कोरोनाने जिह्यात गेल्या चार महिन्यात दररोज नवनवे विक्रम करत चांगलाच फास आवळला गेला आहे. सातारा, कराड, फलटण, वाई या महत्वाच्या शहराबरोबरच ग्रामीण भागात चांगलाच शिरकाव केला आहे. जिल्हय़ातील सुमारे 576 गावांमध्ये कोरोना डेरेदाखल झाल्यामुळे आता कोरोना सोबत जगायचं असा जणू सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विचार येवू लागला आहे. शुक्रवारी रात्रीच्या अहवालात तब्बल 121 जण बाधित आढळून आले असून त्यामध्ये दोन जणांचा तर शनिवारी सायंकाळी तीन जणांचा असे 5 जणांचा मृत्यू आहे तर एकाचा संशयित म्हणून नमुना पाठवला आहे.

रात्रीच्या अहवालात कराड तालुक्यात तब्बल 53 जण बाधित आढळून आले असून यातील बहुतांश शहरातील आहेत. सातारा शहरात केवळ दोनजण बाधित सापडल्याने शहरातील वेग मंदावल्याचे दिसते आहे. शहरात सवयभानकडून प्रबोधन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाई शहरात पालिकेच्या आरोग्य निरीक्षकला बाधा झाली आहे. दरम्यान, शनिवारी 75 जण कोरोना मुक्त झाले आहेत.दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यात 104 बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार पार झाला आहे.

जिल्हय़ात कडक लॉकडाऊन करुनही कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नाही. जिल्हय़ात शुक्रवारी रात्रीपर्यंत 24 हजार 249 जणांचे नमुने घेतले होते. शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 121 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 5 बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे. तसेच दिवसात 75 जण कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Advertisements

कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 66 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 5 वर्षाची बालिका, तडवळे (समर्थनगर) 69 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 39 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा.

शिरवळ अजूनही हॉटस्पॉटच
सातारा जिल्हय़ाचे तपासणी केंद्र असलेल्या शिरवळ हे एका पार्टीमुळे कोरोनाला आमंत्रण देवून बसले. आज त्या गावात मोठय़ा प्रमाणावर बाधीत सापडले आहेत. अजूनही सापडत आहेत. खंडाळा तालुक्यातील स्टार सिटी, शिरवळ येथील 34, वर्षाचा पुरुष, 38 वर्षाची महिला, विंग शिरवळ येथील 44, 52, 25 वर्षाचा पुरुष, शिरवळ येथील 29 वर्षाची महिला, जवळे येथील 34 वर्षीय पुरुष, कुबलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, 31 वर्षीय महिला, 7 वर्षाची बालिका, कवठे येथील 8 वर्षाची बालिका, अंधोरी येथील 31 वर्षीय महिला.

कराड तालुक्यात दिवसांत 53 बाधित
कराड तालुक्यातील सैदापूर येथील 47 वर्षीय महिला, 25 वर्षाचा पुरुष, शिणोली येथील 25 वर्षाचा पुरुष, किवळ येथील 65 वर्षाचा पुरुष, 55 वर्षाची महिला, 34 महिला, 10 वर्षाचा मुलगा, 13 वर्षाची मुलगी, कालगाव येथील 28 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाची महिला, 65 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, येवती येथील 24 वर्षाचा पुरुष, शामगाव येथील 21 वर्षाचा पुरुष, 42 वर्षाची महिला, रविवार पेठ, कराड येथील 42 वर्षाचा पुरुष, मासोली येथील 30 वर्षाचा पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षाचा पुरुष, 56 वर्षाची महिला, 28 वर्षाची महिला, 8 वर्षाची बालिका, शुक्रवार पेठ, कराड 70 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 32 वर्षाची महिला, वडगाव हवेली येथील 37 वर्षाचा पुरुष, गोटे येथील 67 वर्षाचा पुरुष, कालवडे येथील 65 वर्षाची महिला, कालवडे येथील 42 वर्षाची महिला, गुरुवार पेठ, कराड 27 वर्षाची महिला, मलकापूर येथील 53 वर्षाची महिला, कालवडे येथील 6 वर्षाचा बालक, कार्वे येथील 64 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ, कराड 40 वर्षाची महिला, गोंडी येथील 40 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 6 वर्षाचा बालक, कालवडे येथील 30 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षाची महिला, 38 वर्षाची महिला, 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 65 वर्षाचा पुरुष, गुरुवार पेठ, कराड 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार पेठ, कराड 64 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, मलकापूर येथील 28 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 40 वर्षीय पुरुष, आटके येथील 59 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, 90 वर्षाचा पुरुष, 54 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, येवती येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 88 वर्षीय पुरुष, कराड येथील 45 वर्षीय पुरुष

सायगाव बनू पहातेय हॉटस्पॉट
संपूर्ण पुनवडी गावाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या गावात झालेल्या बाधितामुळे सरपंचांवर पदावर राहण्यास असमर्थ आहेत अशा आशयाचा अहवालही जावली पंचायत समितीकडून सातारा जिल्हा परिषदेत आणि जिल्हा परिषदेतून आयुक्तांकडे गेला आहे. असे असतानाच आता सायगाव हॉटस्पॉट बनू पहात आहे. सायगाव येथील 34 वर्षाचा पुरुष, 72 वर्षाचा पुरुष, 67 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडी येथील 52 वर्षाची महिला, 22 वर्षाची महिला, 20 वर्षीय युवक, 54 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील दहिवडी येथील 31 वर्षाचा पुरुष.

वडुजमध्ये बाधित वाढू लागले
खटाव तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षाचा पुरुष, 40 वर्षाची महिला, विसापूर येथील 45 वर्षाचा पुरुष, 50 वर्षाचा पुरुष, वडूज येथील 39 वर्षाचा पुरुष, 24 वर्षाचा पुरुष, 23 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, म्हासुर्णे येथील 87 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला, हिंगणे येथील 34 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील आडूळ येथील 37 वर्षाचा पुरुष बाधित आला आहे.

सातारा शहरात केवळ दोनच बाधित
सातारा तालुक्यातील ठराविक गावामंध्ये अजूनही कोरोनाची धास्ती मोठय़ा प्रमाणावर घेतली जात आहे. रात्रीच्या अहवालात सत्वशीलनगर, सातारा येथील 72 वर्षीय महिला, भवानी पेठ, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, शेळकेवाडी येथील 40 वर्षाची महिला, 18 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, 12 वर्षाची मुलगी, 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 69 वर्षीय महिला, 76 वर्षीय पुरुष, 8 वर्षाची बालिका बाधित आढळून आली आहे.
फलटण तालुक्यातील रमाबाग येथील 75 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 35 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 8 वर्षाची बालिका, महारोळे येथील 42 वर्षाची महिला, एक पुरुष.

वाई पालिकेतही कोरोना घुसला
सातारा, कराड पालिकेनंतर आता वाई नगरपालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाई पालिकेच्या आरोग्य निरीक्षकास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वाई पालिकेतही खळबळ माजली आहे. दुपारी त्याचा अहवाल आला. त्याचबरोबर वाई तालुक्यातील शेंदूरजणे येथील 30, 48 वर्षीय पुरुष, बावधन येथील 70 वर्षीय महिला, पसरणी येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.


75 नागरिकांना दिला डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 75 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. 675 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून तीन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्येजावली तालुक्यातील पुनवडी येथील वय 48, 19, 50, 30, 62, 40, 10, 18, 31, 54, 56 वर्षीय महिला व वय 30, 9, 22, 20, 43, 21, 25 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष.,

सातारा तालुक्यातील खावली येथील 63 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला व 37 व 40 वर्षीय पुरुष, करंडी येथील 43 वर्षीय महिला व 61, 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 5, 17, 38 वर्षीय महिला व 25, 15, 45 वर्षीय पुरुष, कारंदवाडी येथील 23 वर्षीय महिला, नागठाणे येथील 43 वर्षीय महिला, खिंडवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 26 वर्षीय महिला.,

कराड तालुक्यातील किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, बेलावडे येथील 31 वर्षीय महिला, चचेगाव येथील 42 वर्षीय महिला, चरेगाव येथील 38 वर्षीय पुरुष.,

वाई तालुक्यातील परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 28 वर्षीय पुरुष, आसले येथील 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, बदेवाडी येथील 65, 35, 11, 40 वर्षीय महिला व 8, 25 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 48 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगी, नवेचीवाडी येथील 21 वर्षीय युवक, फुलेनगर येथील 32, 26, 28 वर्षीय पुरुष व 24, 39, 50 वर्षीय महिला.,
खटाव तालुक्यातील निमसोड येथील 19 वर्षीय युवती.,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कुंभार आळीतील 28 वर्षीय पुरुष, बाजारपेठेतील 32 वर्षीय पुरुष, रामोशी आळी येथील 30, 15, 17, 37 वर्षीय महिला, ग्रामपंचायत येथील 53 वर्षीय पुरुष.,

पाटण तालुक्यातील कासाणी येथील 60 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, तारळे येथील 34 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, सुर्यवंशीवाडी येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
खासगी रुग्णालयात म्हारुल ता. महाबळेश्वर येथील 52 वर्षीय पुरुष व पसरणी ता. वाई येथील 68 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कण्हेर ता. सातारा येथील 77 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वाघोली ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष व अंगापूर ता. सातारा येथील 35 वर्षीय महिला या दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोघांना श्वसनसंस्थेचा तीव्र जंतु संसर्गाची लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोघांचेही खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात आगशिवनगर ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोरोना संशयित म्हणून त्यांचा नमुना तपासणी साठी घेण्यात आला आहे.

675 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 62, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 35, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 36, वाई येथील 73, शिरवळ येथील 49, रायगाव येथील 73, पानमळेवाडी येथील 146, मायणी येथील 24, महाबळेश्वर येथे 8, पाटण येथील 48, खावली येथील 30 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 675 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

शनिवारपर्यंत जिल्हय़ात
एकुण बाधित 3079
एकुण कोरोनामुक्त 1678
मृत्यू 106
उपचारार्थ 1295

शनिवारी
एकुण बाधित 104
एकुण मुक्त 75
एकुण बळी 05

Related Stories

कोल्हापूर : आकनूर येथे दिल्लीवरुन आलेल्या युवकाला कोरोनाची लागण

triratna

रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईतही पुन्हा लॉकडाऊन ; पालकमंत्र्यांचा इशारा

pradnya p

सातारा : सेवा बजावणाऱ्या ‘सुर्या’चा पोलिसांनी साजरा केला वाढदिवस

triratna

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही : उध्दव ठाकरे

pradnya p

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

Shankar_P

कोल्हापूर- सांगली जिल्ह्यात नोकरदारांना ये-जा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी

Shankar_P
error: Content is protected !!