तरुण भारत

चीनकडून ‘द झियुआन 3′ या मॅपिंग सॅटेलाईटचे प्रक्षेपण

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनने आज ‘द झियुआन 3′ या अतिउच्च दर्जाच्या मॅपिंग सॅटेलाईटचे प्रक्षेपण केले. तेथील स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी शांक्‍सी प्रांतातील तैयुआन सॅटेलाईट लॉन्च सेंटरमधून हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. 

Advertisements

‘द झियुआन 3′ हा उपग्रह लॉन्ग मार्च 4 बी रॉकेटच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आला. लॉन्ग मार्च रॉकेट सिरीजची ही सलग 341 वी अंतराळ मोहीम होती. या रॉकेटवर दोन उपग्रह बसवण्यात आले होते. हे दोन्ही उपग्रह शांघाय ऍसेस स्पेसफ्लाईट टेक्‍नोलॉजी कंपनी लिमिटेडकडून विकसित करण्यात आले आहेत. या उपग्रहांनी पृथ्वीच्या अंतराळ कक्षेमध्ये प्रवेश केला आहे, असे तैयुआन सेंटरने सांगितले आहे.

लॉन्ग मार्च रॉकेटवर असणाऱ्या दोन उपग्रहांपैकी एक उपग्रह अंधारातील वस्तू ओळखण्यासाठी तर दुसरा उपग्रह व्यावसायिक डाटा संकलनाचे काम करणार आहे.

Related Stories

600 दिवसांनी ऑस्ट्रेलियाने स्वकीयांसाठी उघडले द्वार

Patil_p

धोका वाढला : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 11,147 नवे कोरोना रुग्ण; 266 मृत्यू

Rohan_P

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 5 लाखांसमीप

datta jadhav

गाझावरील हल्ल्यात एपीची इमारत उध्वस्त

Patil_p

महाराष्ट्रात कोरोना : मुंबई, पुणे, नागपूरमध्ये लक्षणीय रुग्ण वाढ

Rohan_P

पाकिस्तानात गटारीचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!