तरुण भारत

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क : 

अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 43 लाख 15 हजार 709 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 49 हजार 398 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

शनिवारी अमेरिकेत 67 हजार 413 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 908 जणांचा मृत्यू झाला. दररोज सरासरी 60 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. 43.15 लाख कोरोना रूग्णांपैकी 20 लाख 61 हजार 692 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 21 लाख 04 हजार 629 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 18 हजार 984 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 4 लाख 53 हजार 038 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8427 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 39 हजार 435 जणांना बाधा झाली असून, 32 हजार 665 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Related Stories

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 14 लाखांवर

datta jadhav

पाकचाही चीनला दणका; ‘टिकटॉक’वर घातली बंदी

datta jadhav

झारखंड विधानसभेत ‘नमाजा’साठी स्वतंत्र कक्ष

Patil_p

मुंबईत होळी, धुलिवंदन उत्सव साजरा करण्यास मनाई; पालिकेचा निर्णय

Rohan_P

ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी 5.76 अब्जाचे इनाम

prashant_c

पत्नीकरता तयार केले गोल फिरणारे घर

Patil_p
error: Content is protected !!