तरुण भारत

‘लॉकडाऊन’मध्येही कलमांची विक्रमी विक्री

 कृषी विषयक प्रशिक्षणे राबविणार- डॉ. बी. एन. सावंत

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

Advertisements

वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात लॉकडाऊन कालावधीत म्हणजे मार्च ते जुलै या कालावधीत आंबा, काजू, फणस, जांभूळ, नारळ रोपे, मसाला पिके व अन्य 1 लाख 4 हजार 859 कलमांची विक्री करण्यात आली. पुढील कालावधीत शेतकऱयांसाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध कृषीविषयक प्रशिक्षणांचे आयोजन करून त्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत यांनी सांगितले.

वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात मार्च ते जुलै या कालावधीत आंबा 29 हजार 382, काजू 24 हजार 885, फणस 1 हजार, जांभूळ 20 हजार 234 नारळ रोपे 7 हजार 355, मसाला पिके 14 हजार 3 व अन्य कलमे, रोपे 8 हजार अशी एकूण 1 लाख 4 हजार 859 कलमांची विक्री करण्यात आली.

लॉकडाऊनकाळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन कलम, रोपे विक्री करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कलम, रोपांची विक्री ही अधिक प्रमाणात व लवकर पूर्ण झाली. लॉकडाऊन असल्यामुळे परजिल्हय़ाच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात कलम व रोपांची उचल केली. मुंबईस्थित चाकरमानी बऱयापैकी सिंधुदुर्गात स्थिरावल्यामुळे ते आता शेतीकडे शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पाहत आहेत. पुढील कालावधीत अशा शेतकऱयांसाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध कृषीविषयक प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

Related Stories

चार वर्षांतील ‘इंदिरा आवास’ही मग अनधिकृतच

NIKHIL_N

‘रोटरी’च्या शौर्य गावसला ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक

Abhijeet Shinde

दहावीच्या निकालाची कार्यवाही सुरू

NIKHIL_N

आचरा पारवाडी परिसरात बिबट्याची दहशत

NIKHIL_N

सांगलीची ‘शेवट तितका गंभीर नाही’ अव्वल

NIKHIL_N

पावसामुळे चिखलमय रस्त्याची नगराध्यक्षांकडून डागडुजी

NIKHIL_N
error: Content is protected !!