तरुण भारत

कोरोना : इम्यून सिस्टीम पॅटर्नचा शोध

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या गंभीर रुग्णांच्या शरीरातील एका ‘विशिष्ट इम्यून सिस्टीम पॅटर्न’चा अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. ‘सायन्स’ नावाच्या एका जर्नलमध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 

Advertisements

अमेरिकेतील ‘पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटी’तील शास्त्रज्ञ डिविज मॅथ्यू म्हणतात, कोरोना संशोधनादरम्यान आम्ही 125 कोरोना रुग्णांच्या इम्यून सिस्टीमच्या कोशिकांचा बारकाईने अभ्यास केला. त्यासाठी फ्लो साईटोमेट्री नामक प्रक्रियेचा वापर केला. यामध्ये विशिष्ट इम्यून सिस्टीम पॅटर्नचा शोध लागला. गंभीर कोरोना रुग्णांमध्ये इम्यून सिस्टीम’ कमकुवत झाल्याचे दिसून आले. आतापर्यंत यासंदर्भात माहिती समोर आली नव्हती. अमेरिकन शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे. या पॅटर्नला ‘इम्यूनोटाईप्स’ असे नाव देण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांशी हा पॅटर्न कसा जोडला गेला याचे संशोधन झाल्यामुळे आता कोरोना रुग्णांवर उपचाराचा नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकेल. रुग्णांच्या ‘इम्यूनटोपोलॉजी मॅप’च्या मदतीने त्यांच्यासाठी कोणता उपचार प्रभावी ठरेल हे सांगता येईल, असेही मॅथ्यू यांनी म्हटले आहे. 

Related Stories

संघटनेची अनुमती

Patil_p

पुढील आठवडय़ात मोठा निर्णय घेऊ

Patil_p

राजपुत्र हॅरी अन् मेगन यांना कन्यारत्न

Patil_p

न्यायमूर्ती एनव्ही रमन्ना देशाचे नवे मुख्य न्यायाधीश

datta jadhav

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला एक कोटींचा टप्पा

Abhijeet Shinde

”ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!