तरुण भारत

दिल्लीत गेल्या 24 तासात 1075 नवे कोरोना रुग्ण; 21 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीत रविवारी 1075 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 606 वर पोहचली आहे. यामधील 11 हजार 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Advertisements


रविवारी 1807 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  14 हजार 875 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3827 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 9 लाख 46 हजार 777 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5032 आरटीपीसीआर टेस्ट आणि 12,501 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

अजित पवारांना मोठा धक्का, आयकर विभागाने पाठवली नोटीस

Abhijeet Shinde

दोन पाकिस्तानींसह 6 दहशतवादी ठार

Amit Kulkarni

कोविड सेंटरमधील आगीत आंध्रात 10 रुग्णांचा मृत्यू

Patil_p

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करुन दशतवाद्यांना पैसे पुरविल्याचा संशय

prashant_c

विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाचा दिलासा

prashant_c

महाराष्ट्रात 24 तासात 1576 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!