तरुण भारत

भारताने दौलत बेग ओल्डी येथे तैनात केला T-90 टँकचा ताफा

ऑनलाईन टीम / लेह : 

चीनने अक्साई चीन परिसरात 50 हजार सैन्य तैनात केले आहे. त्यामुळे भारतीय लष्करानेही युद्धसज्जता ठेवत पहिल्यांदाच दौलत बेग ओल्डी येथे मिसाईलचा मारा करणाऱ्या T-90 टँकचा ताफा आणि चार हजार सैन्य वाहनांसह तैनात केले आहे.

Advertisements

भारतीय लष्कराने दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये अडवान्स लँडिंग ग्राउंड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात टँक देखील तैनात करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराची चीनच्या हालचालींवर करडी नजर आहे. पेट्रोलिंग पॉइंट्स 14, 15, 16, 17 आणि पेंगोंग त्सो फिंगर परिसरात चीनी आक्रामकतेनंतर आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स (एपीसीएस) आणि इन्फेंटरी कॉम्बॅट वाहने, एम 777 155mm होवित्जर आणि 130 mm बंदुका सुरुवातीलाच पाठविण्यात आल्या आहेत.

पँगाँग टीएसओ, डेपसांग या भागामधून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेले नाही. तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतानेही युद्धसज्जता ठेवली आहे. 

Related Stories

खासगी’त 250 रुपयात लस

Amit Kulkarni

कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

prashant_c

राजस्थान : खाजगी रुग्णालय आणि लॅबमध्ये होणार 2200 रुपयांमध्ये कोरोना टेस्ट

pradnya p

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश – आशिष शेलार

triratna

टीकेनंतरही तीरथसिंग वक्तव्यावर ठाम

Patil_p

अभिनेता अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार

Omkar B
error: Content is protected !!