तरुण भारत

फ्रान्समध्ये कोरोना चाचणी होणार मोफत

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

फ्रान्सने देशातील नागरिकांसाठी कोरोना चाचणी मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या नागरिकांनी यापूर्वी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली असेल, त्यांनाही रिफंड देण्यात येणार असल्याची घोषणा फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरन यांनी केली आहे. 

Advertisements

फ्रान्समध्ये कोणताही नागरिक पीसीआर कोरोना चाचणी पुन्हा करू शकतो. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याची अथवा चिठ्ठीची गरज नसेल. लक्षणे नसलेले नागरिकही मोफत कोरोना चाचणी करून घेऊ शकतात. फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन वेरन यांनी केले आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत फ्रान्सचा जगात 19 वा क्रमांक लागतो. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1 लाख 80 हजार 528 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 80 हजार 815 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 69 हजार 527 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामधील 410 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आतापर्यंत 30 हजार 192 रुग्ण दगावले आहेत.

Related Stories

लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह अन्य एकाचा खात्मा

datta jadhav

महागाईचा भडका : पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग

Rohan_P

”1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?”

triratna

सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यावर भारत-चीनचे एकमत

datta jadhav

तृतीयपंथीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के जागा राखीव; कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय

triratna

राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अखेर सुरू

Rohan_P
error: Content is protected !!