तरुण भारत

वाईचा ब्रिटिश कालीन कृष्णापूल होणार नामशेष, नविन पुलास मंजुरी – आमदार पाटील

प्रतिनिधी / वाई

वाई नगरपालिका हद्दीतील शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा ब्रिटिश कालीन जुना कृष्णा पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी तेरा कोटी रुपयांच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

वाई शहराच्या मधून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर ब्रिटिश सरकारने १८८४ मध्ये (१३६ वर्षांपूर्वी ) दगडी बांधकामात आकर्षक पूल बांधलेला आहे. शहराच्या दक्षिण उत्तर भागांना जोडणाऱ्या या कृष्णा पुलामुळे शहर एकमेकाला जोडलेले आहे.या आकर्षक पुलावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. सध्या हा पूल शहराची जीवन वाहिनी आहे. कृष्णा पुल नागरी जीवनाशी फारच एकरूप झालेला असून स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनापासून अनेक सांस्कृतिक ,सामाजिक चळवळीशी जोडला गेल्याने त्याचे वाई करांशी एक भावनिक नातेही तयार झालेला आहे.
हा ब्रिटिश कालीन जुना पूल वाहतुकीस अपुरा पडत आहे. पावसाळ्यात नदीला महापूर आला की वाहतुकीस बंद करण्यात येतो. अवजड वाहनांना, एस टी वाहतुकीला हा पूल बंद करण्यात आलेला आहे. कृष्णा पूल हा वाईकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने हा पूल पाडून नव्याने पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे या पुलाचे आरेखन व खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. पुढील शंभर वर्षाच्या वाहतुकीला पुरा पडेल अशा दृष्टीने पुलाचे नियोजन करण्यात आले आहे.
वाई शहरातील कृष्णा तिरावरील जुना ब्रिटिश कालीन जुना वाहतुकीस व रहदारीस अयोग्य झालेला पूल पाडून नवीन बांधण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी रक्कम रुपये तेरा कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी शंभर टक्के निधी शासन देणार असून पालिकेच्या अखत्यारीत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
पालिकेच्या उत्पन्नातून हे काम होऊ शकत नसल्याने शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामास शासनाने मंजुरी दिली असून लवकरच या कामाच्या ई निविदा प्रसिद्ध होतील. एक वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे असेही आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. सर्व वाईकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये २५ कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

एसटी कर्मचारी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर करणार

datta jadhav

साताऱयातील हॉटेल व्यवसाय सुरु करा

Patil_p

जिल्हा वाहतूक शाखेच्या जवानांचा प्रामाणिकपणा

Patil_p

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट

Abhijeet Shinde

जिल्हय़ात शुक्रवारी तीन पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!