तरुण भारत

कोल्हापूर : कळंब्यातील जुगार अड्यावर छापा ; शस्त्रासह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

राजेंद्र होळकर/कोल्हापूर

कळंबा कारागृहा शेजारी सुरु असलेल्या जुगार अड्यावर जुना राजवाडा पोलिसांनी आज, सोमवारी दुपारी छापा टाकला. यावेळी अड्डा मालकासह जुगार खेळणाऱ्या १९ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २८ हजार ४०० रूपये, १ लाख २१ हजार रुपये किंमतीचे १६ मोबाईल हॅण्डसेट आणि ६ लाख ३० हजार रुपये किंमतीची ५ दुचाकी वाहने आणि १ चारचाकी अशा ७ लाख ७९ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, कळंबा कारागृहाशेजारी असलेल्या विजय चंदर भोसले यांच्या घरी कासिम इमाम मुल्ला ( रा . लक्षतीर्थ वसाहत ) यांने बेकायदेशिर तीन पानी जुगार अड्डा सुरु केला होता. यांची माहिती समजताच या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. घर मालकासह अड्डाचालक आणि १९ जुगार खेळणाऱ्याना अटक केली.

कासिम इमाम मुल्ला ( रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापुर), विजय चंदर भोसले (रा. बी बॉर्ड , कळंबा जेल नजीक), परशुराम बाजीराव कांबळे ( रा. सदर बझार हौसिक सोसायटी शेजारी, सदर बझार कोल्हापूर), सचिन वसंत हेगडे (रा. आण्णासो शिंदे शाळेचा पाठीमागे, लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर), सुर्यकांत बाबूराव चौगुले (रा. सदर बाजार , कोल्हापूर), अमिर दस्तगीर फकीर ( रा.सदर बाजार , कोल्हापूर), रोहीत राजेंद्र नलगे (रा . महात्मा फुले गल्ली, कळंबा, कोल्हापूर), रूपेश उर्फ सागर पांडुरंग माने ( रा . कत्यायनी कॉप्लेक्स कळंबा रोड, कोल्हापूर), सुरेश लक्ष्मण कुऱ्हाडे (रा . राजारामपूरी १४ वी गल्ली, दौलतनगर), राकेश किसन चौगुले (रा. टिबर मार्केट जवळ, राजाराम चौक), मोहन कचोर सिद्धगणेश (रा. शोले नगर झोपडपट्टी, कोल्हापूर), अजित जालीदर गायकवाड (रा . यादव नगर किरण प्रगती स्टोअर शेजारी, कोल्हापूर), आलम इमाम मुल्ला (रा . आण्णासो शिंदे शाळेजवळ, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), बकशु महमद मंगळवेडे ( रा . आंबेडकर नगर कोल्हापूर), वंसत माराणा पूजारी (रा. विचारे माळ), सागर खंडू कांबळे (रा. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेच्या पाठीमागे, राजेंद्रनगर, कोल्हापूर), सतिश सर्जेराव जगदाळे (रा . आर के गॅसचे शेजारी, रंकाळा टॉवर , कोल्हापूर), समीर माला बागवन (रा.लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), विजय सुनिल साठे (रा. कत्यायनी कॉम्लेक्स, कळंबा कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

घरमालकांच्या घरातून शस्त्राचा साठा जप्त

विजय चंदर भोसले याने आपले राहते घर तीन पानी जुगार अड्डा सुरु करण्यासाठी भाड्याने दिलेच. त्याचबरोबर त्याने घरामध्ये अवैध शस्र साठा करुन ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याच्या घरातून तलवारी , दोन एडके , एक कोयता अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत. त्याच्याविरोधी जुगार, संचारबंदीचे उल्लघंन करणे या गुन्हयाबरोबर भारतीय हत्यार अधिनियम १ ९ ५ ९ चे कलम ४,२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

Related Stories

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’

Rohan_P

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 6 बळी, 269 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

महाविकास आघाडी नेते आणि राज्यपालांची भेट ‘या’ कारणामुळे टळली

Abhijeet Shinde

सोलापूरला धक्क्यामागून धक्के ; शनिवारी नवीन ३२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Abhijeet Shinde

कोल्हापूर विमानतळावरून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी

Sumit Tambekar

महाविकास आघाडी हे संभ्रमाचे सरकार : चंद्रकांतदादा पाटील

Sumit Tambekar
error: Content is protected !!