तरुण भारत

पुणे : मंडई गणपतीची यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल मंडई मंडळाचा निर्णय

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्याच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या गणेशोत्सवात दिमाखदार उत्सव अखिल मंडई मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहे. मंडळाच्या शारदा गजाननाची गेल्या 127 वर्षांत यावर्षीच्या गणेशोत्सवात प्रथमच मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements


अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी अखिल मंडई मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे 125 वे वर्ष देखील विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. परंतु पुण्यात कोरोनामुळे वाढणा-या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला मुरड घालून मंडळातर्फे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे.  


गणेशोत्सवाच्या 127 वर्षांच्या परंपरेत प्रथमच शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून मंडपात हलविण्यात येणार नाही. मंदिरातच सर्व धार्मिक विधी साजरे केले जाणार आहेत. यावेळी सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने पुणेकर आणि महाराष्ट्रातील भाविक येतात. यावेळी सॅनिटायझर, मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अखिल मंडई मंडळाच्या अनेक चांगल्या उपक्रमांचे अनुकरण पुण्यातील इतर मंडळे करतात. त्यामुळे यंदाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी मंदिरातच उत्सव साजरा करावा, असे आवाहन देखील मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

Patil_p

गुगलचे खास डूडल : डॉक्टर्स, नर्सच्या कामाला सलाम!

prashant_c

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास

Rohan_P

बर्फातून वाट काढत गर्भवती महिलेला जवानांनी पोहोचवले रुग्णालयात

prashant_c

… अन् तीनशे रुपयांच्या बॉडी लोशनऐवजी ॲमेझॉनने दिले 19 हजारांचे हेडफोन्स

datta jadhav

अंगारक संकष्टी : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून ऑनलाईन दर्शनाची सोय

Rohan_P
error: Content is protected !!