तरुण भारत

कच्चे पोलाद उत्पादन 68 लाख टनावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

देशामध्ये पोलाद क्षेत्रातील कामगिरीत सुधारणा होत असल्याचे पहावयास मिळत असल्याची माहिती असून यामध्ये जून महिन्यातील देशातील कच्चे पोलाद उत्पादन 68 लाख टनावर राहिले आहे. जे मे महिन्याच्या तुलनेत 17.7 टक्क्यांनी अधिक झाल्याची माहिती पोलाद मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Advertisements

सदरचे उत्पादन मात्र एक वर्षाच्या जूनसोबतशी तुलना केल्यास यामध्ये 27.2 टक्क्मयांनी उत्पादन कमी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. मे 2020 पासून आर्थिक गती पूर्वपदावर येत कामगिरीत सुधारणा होत गेल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. यामुळे एप्रिलमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्पादनात घसरण झाली होती. परंतु सध्या प्रमुख 8 क्षेत्रातील विविध उद्योगांच्या समाधानकारक कामागिरीमुळे हे आकडे पहावयास मिळाले असल्याचे स्पष्टीकरण पोलाद मंत्रालयाने दिले आहे. कारण एप्रिलमध्ये विक्रमी म्हणजे 37 टक्क्मयांच्या खाली हा आकडा गेला असून मेमध्ये ही घसरण 23.4 टक्क्यांवर राहिली होती.

जून 2020 मध्ये पक्के पोलाद उत्पादन 59 लाख टनाच्या घरात राहिले आहे. मात्र हा आकडा मे महिन्याच्या तुलनेत 15.6 टक्क्मयांनी अधिक राहिला आहे. सरकारने 2030 पर्यंत देशातील कच्च्या पोलादाची उत्पादन क्षमता वाढवून 30 कोटी टनपर्यंत नेण्याचे निश्चित केले असल्याची माहिती आहे.

Related Stories

साखर उत्पादन 12 टक्क्मयांनी वाढणार ?

Patil_p

कॅशलेश क्लेमबाबत इरडाचा नवा आदेश

Patil_p

10 कंपन्यांकडून 5 लाख 13 हजार कोटींची भर

Patil_p

ऍमवे इंडियाच्या ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून मीराबाई चानू यांची निवड

Amit Kulkarni

टीसीएसचे 75 टक्के कर्मचारी 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होम

Patil_p

67 हजार 400 कोटीचा परतावा

Patil_p
error: Content is protected !!