तरुण भारत

सांगली : अँटिजेनमध्ये मनपाचे तीन कर्मचारी पॉझिटिव्ह, ५८ नवे रुग्ण

सांगली : प्रतिनिधी

महापालिकेचे आणखी तीन कर्मचारी अँटिजेंन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आहे. दरम्यान सोमवारी दिवसभरात शहरातील इंदिरानगर, गवळी गल्लीसह अन्य परिसरातील ५१८ जणांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली. यामध्ये ५८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. सांगली व मिरजेतील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

Advertisements

कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिक प्रशासनाने मनपा क्षेत्रात रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे. कंटेन्मेंट झोन मधील ५० वर्षावरील तसेच अनेक आजार असणाऱ्या नागरिकांची अँटिजेंन चाचणी घेण्यात येत आहे. यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीवर तातडीने उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रातील कोरोना बधितांच्या मृत्यूचा दरही कमी झाला आहे. 

 दरम्यान मनपा क्षेत्रात सोमवारी ५१८ जणांची अँटिजेंन चाचणी करण्यात आली. यामध्ये ५८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. यामध्ये तीन महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान कोरोना बाधित व्यक्तींच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या सात दिवसात दोन हजार १४२ जणांची अँटिजेंन चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १६६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

Related Stories

सातारा तालुक्यात एका रात्रीत १२ कोरोना बाधित

Abhijeet Shinde

मिरजेत चिमुकल्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

Abhijeet Shinde

पाटणमध्ये गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे सहित एकास अटक

Patil_p

समडोळीच्या भोंदू मुजावर बाबाचा पर्दाफाश

Abhijeet Shinde

उद्धवजी, शरद पवार आणि राष्ट्रवादीचा तुम्हाला संपविण्याचा डाव : भाजप प्रदेशाध्यक्ष

Abhijeet Shinde

तिरुपती-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस रद्द

Abhijeet Shinde
error: Content is protected !!