तरुण भारत

बांगलादेशला सोपविले 10 ब्रॉडगेज डिझेल इंजिन्स

भारताकडून शेजाऱयाला सहकार्य

नवी दिल्ली

 भारताने बांगलादेशला 10 ब्रॉडगेज डिझेल इंजिन्स सोमवारी सोपविले आहेत. भारताच्या गेदे रेल्वेस्थानकावरून सर्व इंजिन्स रवाना करण्यात आल्या असून बांगलादेशच्या दर्शना रेल्वेस्थानकावर त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. 3300 अश्वशक्तीचे डब्ल्यूडीएम 3 डी लोको इंजिनांचे वय 28 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.

विदेशमंत्री एस. जयशंकर, रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी विदेश मंत्रालयातून हिरवा झेंडा दाखवून या इंजिन्सना बांगलादेश करता रवाना केले आहे. बांगलादेशला दिल्या जाणाऱया या इंजिन्सचा कमाल वेग 120 किलोमीटर प्रतितास राहणार आहे. मालवाहतुकीसह प्रवासी रेल्वेगाडय़ांसाठी हे इंजिन उपयुक्त ठरणार आहे. या इंजिनमध्ये मायक्रोप्रोसेसर आधारित नियंत्रण प्रणाली आहे.

भारत आणि बांगलादेशचे संबंध तसेही अत्यंत उत्तम आहेत. परंतु अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमुळे द्विपक्षीय संबंध आणखीन बळकट होतात. या इंजिन्ससाठी बांगलादेशने मागील वर्षी एप्रिलमध्ये प्रस्ताव पाठविला होता. या इंजिन्समुळे  बांगलादेश रेल्वेला मोठे बळ प्राप्त होणार आहे. भारतीय रेल्वेने बांगलादेश रेल्वेची गरज ओळखून ही 10 इंजिन्स तयार केली आहेत.

Related Stories

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार

Patil_p

पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी साधला संवाद

triratna

दहशतवाद्यांचा नायनाट सुरूच

Patil_p

3 हजार 860 जण कोरोनामुक्त

Patil_p

पाकिस्तानच्या सैन्याला राजकीय आव्हान

Patil_p

आधारची जोडणी मतदार ओळखपत्राशी केली जाणार

Patil_p
error: Content is protected !!