तरुण भारत

मुंबईसह तीन शहरात हायटेक प्रयोगशाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथील हायटेक कोरोना तपासणी प्रयोगशाळांचे उद्घाटन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना स्वॅब चाचणीचा वेग वाढविण्याला मदत होणार आहे. या उद्घाटन सोहळय़ानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून भाषणही केले. या सोहळय़ाला त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही कार्यक्रमस्थळावरून ऑनलाईन सहभागी झाले होते. या प्रयोगशाळा सुरू झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला धन्यवादही दिले.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सर्व देशवासियांनी अजूनही काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रसार वाढत असला तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. कोरोनाविरोधी लस शोधण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ-संशोधक अहोरात्र मेहनत घेत आहेत. जानेवारीमध्ये आपल्या देशात कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी एकच प्रयोगशाळा होती. आता संपूर्ण देशात 1,300 प्रयोगशाळा आहेत. आता त्यात आणखी तीन हायटेक प्रयोगशाळांची भर पडली असून चाचण्यांचा वेग मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सध्या एका दिवसात देशात पाच लाखांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांचे प्रमाण पुढील काही दिवसात 10 लाखांपर्यंत घेऊन जाण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

कुस्तीपटू प्रिया मलिकला वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

Abhijeet Shinde

उत्तरप्रदेश : कार-ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 ठार

datta jadhav

‘पईसावालाके होअत बा कोरोना’

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1लाख 19 हजार 628 वर

Rohan_P

बांग्लादेश सीमेवर अडकलेल्या शेतमालाची आजपासून निर्यात

prashant_c

भोपाळमध्ये 24 जुलैपासून पुन्हा एकदा लॉक डाऊन

Rohan_P
error: Content is protected !!